शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून कालव्यांची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांसाठी ठाणेपाडा ता.नंदुरबार येथील लघुतलावातून शेतक:यांना सिंचनासाठी आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध व्हावे, पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांसाठी ठाणेपाडा ता.नंदुरबार येथील लघुतलावातून शेतक:यांना सिंचनासाठी आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध व्हावे, पाणी पुरवठय़ासाठी कुठल्याही अडचणी येऊ नये, यासाठी लोकसहभागातून कालव्यांची दुरुस्ती करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा व शनिमांडळ या क्षेत्रातील शेतक:यांना रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ठाणेपाडा येथील लघुतलाव यंदा दमदार पावसामुळे चांगला भरला आहे. त्यामुळे हा तलाव यंदाच्या रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी आधारभूत ठरत आहे. या तलावाचे दोन्ही कालवे व पाटचारी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाटबंधारे विभाग, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाटबंधारे विभागाचे कॅनॉल निरीक्षक कोळी, डीएससी संस्थेचे कार्यकारी संचालक मोहन शर्मा, प्रकल्प संचालक जितेंद्र सोनवणे, राकेश अहिरराव सुधिर मावची, चंद्रकांत देवरे, शामकांत पाटील, जयदीप पनवार, प्रकाश सोनवणे, सुकन्या देवरे, भाग्यश्री राठोड आदी उपस्थित होते. यावेळी ठाणेपाडा धरणाच्या दोन्ही कालव्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या धरणातून शेतक:यांना समान पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले. यासाठी पाणी वापर संस्था देखील स्थापन करण्याचा निर्णय घेत त्याद्वारे सिंचन व्यवस्थापन करीत सर्व शेतक:यांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रय} केला जाणार आहे. बैठकीत लोकसहभागातून कालव्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेत प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली. त्यात ठाणेपाठा व शनिमांडळ परसरातील शेतक:यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला. त्यांच्याकडून धरणाच्या कालव्यांमध्ये वाढलेली झाडे, झुडपे काढण्यात आली. त्याशिवाय पाटचारींची देखील दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे ठाणेपाडा व शनिमांडळ भागातील बहुसंख्य शेतक:यांना या धरणातील पाणी उपलब्ध होणार आहे. 

ठाणेपाडा धरणातील पाणी व्यवस्थापनासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत पाणी वापर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कुठल्याही शेतक:यावर अन्याय न होता समान पद्धतीने पाण्याचे वाटप करता येणार आहे. शेतक:यांच्या हितासाठी विविध निर्णय घेणे व नियोजनासाठी सात सदस्सांची एक समिती देखील स्थापन करण्यात येणार आहेत. या समितीमार्फत पाणी वाटपाच्या नियोजनासह सिंचन, व्यवस्थापन, नियम-अटी तयार करण्यात येणार आहे. या अटीनुसारच पाणी वाटप करण्यात येणार आहे.शेतक:यांच्या सिंचन सुविधांसाठी काम करतांना शेतक:यांना भरघोस उत्पादन घेता यावे, यासाठी विविध उपक्रम देखील घेण्यात येणार आहे. त्यात शेतीच्या नवीन व सुधारित पद्धती, सिंचनाचे तंत्रज्ञान, पिक पद्धती यावर देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतक:यांच्या सर्वागिण विकासासाठी शेतीशाळा, पिक प्रात्यक्षिके, माती परिक्षण हे उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे. त्याशिवाय शेतकरी गट स्थापन करीत त्यांना गांडुळ खत निर्मिती, बिज प्रक्रिया हे उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे शेतक:यांच्या विकासात भर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.