कूपनलिकांची पातळी खोल गेल्याने उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:31 IST2020-06-11T12:31:41+5:302020-06-11T12:31:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेत शिवारातील विंधन विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी हैराण झाले ...

Remedy for deepening of coupon lines | कूपनलिकांची पातळी खोल गेल्याने उपाययोजना

कूपनलिकांची पातळी खोल गेल्याने उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेत शिवारातील विंधन विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. लवकर पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आतापासूनच उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.
तालुक्यातील अलखेड, पाडळदा या शिवारातील विंधन विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. सद्य:स्थितीत पाणी पातळी खालावली असली तरी खरीप हंगामात किमान सोयाबीनचे उत्पन्न तरी घेता यावे यासाठी परिसरातील शेतकºयांकडून पाणी मिळवण्यासाठी सबमर्सिबल मोटर खाली उतरविणे, जळालेली सबमर्सिबल दुरूस्त करणे व नवीन बसविणे यासारख्या विविध उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच सुमारे ७०० फुट बोअरिंग करूनही पाणी लागत नसल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येत्या काळात भूजल पातळी वाढावी म्हणून परिसरातील शेतातील पाणी शेतातच जिरविणे, नदी नाल्यांचे खोलीकरण करीत लघु बंधारे बांधून पाणी अडविणे यासारख्या कामांना भर देणे गरजेचे आहे. तालुक्यात बºयाच ठिकाणी मनरेगाची कामे सुरु आहेत़ यातून काहीअंशी लाभ मिळण्याची शक्यता आहे़ तालुक्यात अनेक तलावांचा गाळ काढणे सुरु असल्याने भूजन वाढणार आहे़ असे असले तरी परिसरातील शेतकºयांकडून ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे.
शेतात वापरल्या जाणाºया ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होत असल्याने कमी पाण्यात देखील विविध पिकांचे उत्पादन घेता येणार आहे़ तसेच ठिबक सिंचनासाठी शासनाच्यावतीने अनुदानही देण्यात येते.

Web Title: Remedy for deepening of coupon lines