रेमडेसिविरचे राजकारण नंदुरबारात पुन्हा तापले, माजी आमदार, खासदारांचे आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST2021-04-27T04:31:31+5:302021-04-27T04:31:31+5:30

नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शन वाटपावरून सुरू झालेले खासदार व माजी आमदारांमधील राजकारण थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी ...

Remdesivir's politics heats up again in Nandurbar, allegations of former MLAs, MPs | रेमडेसिविरचे राजकारण नंदुरबारात पुन्हा तापले, माजी आमदार, खासदारांचे आरोप-प्रत्यारोप

रेमडेसिविरचे राजकारण नंदुरबारात पुन्हा तापले, माजी आमदार, खासदारांचे आरोप-प्रत्यारोप

नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शन वाटपावरून सुरू झालेले खासदार व माजी आमदारांमधील राजकारण थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व खासदार डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. एका व्यासपीठावर येऊन दूध का दूध व पाणी का पाणी करण्याचे आव्हान दोघांनी एकमेकांना दिले.

सामान्यांना मिळणारे रेमडेसिविर खासदार हिना गावित यांच्या तक्रारीमुळे बंद झाल्याचा आरोप रघुवंशी यांनी केला होता, तर वाटपात रघुवंशी आणि जिल्हाधिकारी यांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार गावित यांनी केला होता. त्या आरोपांची पुन्हा री ओढत दोन्ही नेत्यांनी सोमवारी पुन्हा वैयक्तिक आरोप केले. जिल्हाधिकारी राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागल्याने त्यांना गावित परिवाराकडून त्रास दिला जात असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले, तर आपण आपल्या कामांवर निवडून येतो, कुणा प्रतिस्पर्धीची आपल्याला काय चिंता असे खासदार गावित यांनी स्पष्ट केले. रेमडेसिविर कुणी किती वाटप केले, भ्रष्टाचार झाला का? याचे खरे-खोटे करण्यासाठी एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान-प्रतिआव्हान दोघा नेत्यांनी यावेळी दिले. एकूणच रेमडेसिविर वाटपावरून सुरू झालेले राजकारण आता कुठे जाऊन थांबते याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Remdesivir's politics heats up again in Nandurbar, allegations of former MLAs, MPs