जलाशयांवर ७० स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:55 IST2020-03-06T11:54:59+5:302020-03-06T11:55:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील धरणांच्या जलाशयांवर येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची नोंदणी करण्यात शहादा येथील वन्यजीव संस्थेला यश ...

Records of 3 migratory birds on reservoirs | जलाशयांवर ७० स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी

जलाशयांवर ७० स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : शहादा तालुक्यातील धरणांच्या जलाशयांवर येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची नोंदणी करण्यात शहादा येथील वन्यजीव संस्थेला यश आले आहे़ संस्थेने तब्बल ७० पक्ष्यांची नोंद केली असून हे पक्षी दरवर्षी येथे स्थलांतर करत असल्याने त्यांचा अभ्यास करणे यामुळे सोयीस्कर होणार आहे़
वन्यजीव संस्थेने राबवलेल्या या उपक्रमास शहादा वनविभागाचे सहकार्य मिळाले़ संस्थेने जैवविविधता नोंदणींतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला होता़ नोंद करण्यात आलेल्या पक्ष्यांच्या छायाचित्रांसह माहीती पुस्तिका तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ संस्थेचे पक्षी अभ्यासक तब्बल १५ दिवस तालुक्यातील दरा धरण, राणीपूर धरण, गोमाई धरण, डोंगरगाव तलाव आणि दुधखेडा धरण याठिकाणी थांबून होते़ यात त्यांनी दर्वीमुख, रंगीत बगळा, वैष्णव बदक, गडवाल बदक, ब्राह्मणी बदक, भुवई बदक या स्थलांतरीत पक्ष्यांचा देखील समावेश आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सागर निकुंभे, अमोल जमादार, भीमसेन रावताळे यांनी या पक्ष्यांच्या नोंदी केल्या तर छायाचित्रकार युवराज मराठे यांनी छायाचित्रे घेतली आहेत़


जिल्ह्यातील विविध भागातील पाणथळ जागा, धरणे आणि जलाशयांवर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात उत्तर भारतातून परदेशी पक्षी बिनीच्या हंगामासाठी स्थलांतर करतात़ या पक्ष्यांच्या नोंदी घेण्याचे काम वनविभाग त्या-त्या भागात करत आहे़ वन्यजीव संस्थेने जिल्ह्यात हे काम सुरु केल्याने दुर्मिळ अशा पक्ष्यांच्या नोंदी होऊन त्यांच्यावर अभ्यास करणे सोपे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

 

Web Title: Records of 3 migratory birds on reservoirs