शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

किलीमांजरोनंतर एव्हरेस्टचे शिखर गाठायचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:01 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील अनिल वसावे हा युवक येत्या २६ जानेवारीला दक्षिण अफ्रिकेतील ...

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील अनिल वसावे हा युवक येत्या २६ जानेवारीला दक्षिण अफ्रिकेतील किलीमांजरो या शिखरावर भारताचा तिरंगा फडकावणार आहे. हे शिखर गाठण्यासाठी जाणाऱ्या भारतातील १० गिर्यारोहक पथकात त्याची निवड झाली आहे. दक्षिण अफ्रिकेतील अतिशय अवघड व आव्हानात्मक असलेले हे शिखर सर केल्यानंतर एव्हरेस्टचे शिखर गाठण्याचे त्याचे स्वप्न असून त्यासाठी तो प्रयत्न करीत आहे. 

अनिल वसावे हा अतिदुर्गम भागातील बालाघाट, ता.अक्कलकुवा येथील रहिवासी. त्याच्या गावापर्यंत वाहन जात नाही. बालाघाटहून एक किलोमीटर पायी चालल्यानंतर तो राहत असलेल्या देवबारीपाडा ही वस्ती येते. या वस्तीजवळच सातपुड्याचा मोठा डोंगर आहे. या डोंगरावर चढ-उताराच्या सवयीतून त्याला गिर्यारोहणाचे वेड लागले. आणि त्यातूनच त्याने आतापर्यंत महाराष्ट्रातील कळसूबाई, अजिंक्यतारा, गटेश्वर, हरिश्चंद्र गड आणि सातपुड्यातील अस्तंबा तसेच चेन्नई येथील शिखर सर केले आहे. त्याची गुणवत्ता हेरुन आंतरराष्ट्रीय कोच आनंद बनसोडे यांनी त्याची किलीमांजरोसाठी निवड केली आहे.

दक्षिण अफ्रिकेतील किलीमांजरोचे शिखर सर करण्याची सुरुवात २२ जानेवारीला भारतीय पथक मोशीपासून करणार आहे. २६ जानेवारीला शिखर गाठतील.

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात गावाजवळीलच डोंगरावर चढ-उताराचा सराव करून थेट आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकाचा मान पटकावणारा बालाघाट, ता.अक्कलकुवा येथील अनिल वसावे या युवकाची यशकथा म्हणजे सातपुड्यातील प्रत्येक आदिवासी तरुणासाठी प्रेरणा देणारी ठरली आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्याने मिळविलेले यश थक्क करणारे आहे.

अनिल वसावेचे शिक्षण बालाघाटमधीलच वस्तीशाळेत झाले. या वस्तीशाळेतच त्याने प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले. त्यानंतर बारावीपर्यंत आश्रमशाळेत शिक्षण घेतले. पुढे सातारा येथे डी.फार्मसी करुन मुक्त विद्यापीठातून त्याने बी.ए.ची पदवी घेतली आहे. सध्या तो स्पर्धा परीक्षेचा सराव करीत आहे.

किलीमांजरोचे शिखर गाठल्यानंतर आपण लागलीच एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करणार आहोत. एव्हरेस्ट गाठणे हे आपले स्वप्न असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. एकदा हे शिखर गाठल्यानंतर सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातील तरुणाईत खूप टॅलेन्ट दडले आहे. हे टॅलेन्ट शोधून त्याला आकार देण्यासाठी आणि व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सातपुड्यात अकादमीची स्थापना करण्याचा मानस आहे. त्यासाठी जे जे शक्य ते करू.-अनिल वसावे, गिर्यारोहक. बालाघाट, ता.अक्कलकुवा.