शहाद्यात व्यावसायिकांवर पुन्हा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:50+5:302021-05-07T04:31:50+5:30

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी शासन निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. ...

Re-action on professionals in martyrdom | शहाद्यात व्यावसायिकांवर पुन्हा कारवाई

शहाद्यात व्यावसायिकांवर पुन्हा कारवाई

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी शासन निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. त्यात साऱ्यांचेच नुकसान होत असले तरी ‘ब्रेक द चेन’साठी शासनाने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे काटेकोर पालन करून कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तोडण्यासाठी सर्वांनीच प्रशासनास मदत करणे क्रमप्राप्त आहे. वारंवार प्रशासनातर्फे सूचना देऊनही काही व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवली होती. गुरुवारी पालिका व पोलीस प्रशासनाने स्थापन केलेल्या संयुक्त पथकाने सुमित गारमेट्स, लक्ष्य कलेक्शन, प्रदीप शिवनारायण बूब ही दोन दुकाने सील केली तर न्यू महिला स्टोर, कमल लेडिज वेअर, मेट्रो इलेट्रॉनिक्स व ५६ गाळा मार्केटमधील एका इलेक्ट्रॉनिक दुकान मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ, महाजन, नगर परिषदेतील भरारी पथक कार्यालय पर्यवेक्षक माधव गाजरे, अभियंता संदीप टेंभेकर, स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, सचिन महाडिक यांच्यासह पालिका व पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

व्यावसायिकांची रॅपिड टेस्ट

यावेळी सप्तशृंगी माता मंदिर परिसरातील वडापाव व नाश्ता कॉर्नर चालवणाऱ्या चार लॉरीधारकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन पथकाने करून त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी फक्त पार्सल द्यावेत, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Re-action on professionals in martyrdom