शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेपाड्यात आढळले दुर्मिळ प्रजातीचे ‘काळवीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:31 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणेपाडा वनक्षेत्रात ब्लॅक बक हे ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणेपाडा वनक्षेत्रात ब्लॅक बक हे दुर्मिळ प्रजातीचे काळवीट आढळून आले आहे़ गेल्या १०० वर्षात या वनक्षेत्रात काळविटाची कोणतीही नोंद नसताना अचानक हा प्राणी समोर आल्याने ठाणेपाडा वनक्षेत्र वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित होत असल्याचे स्पष्ट होत आहे़वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ठाणेपाडा वनक्षेत्रात हरीणवर्गीय प्राणी फिरत असल्याचे दिसून आले होते़ त्याच्या पाऊल खुणा आणि वर्णन याची पडताळणी केल्यानंतर मादी काळवीट असल्याचा उलगडा झाल्यानंतर वनविभागाने आनंद व्यक्त केला होता़ अचानक आलेले हे काळवीट स्थलांतरीत असावे असा अंदाज आहे़ गेल्या काही वर्षात ठाणेपाडा वनक्षेत्रात स्थानिक लोक, संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनविभाग यांच्या वन व्यवस्थापनामुळे वन्यजीवांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे प्रमाण वाढत आहे़ ठाणेपाडा वनक्षेत्र हे शुष्क प्रदेशाचा एक भाग आहे़ त्यातून येथे गवतवर्गीय वनस्पतींची वाढ झाल्याने तृण भक्षी प्राण्यांचा संचार सुरु झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातूनच काळवीट येथे आले असावे असा अंदाज आहे़ दुर्मिळ असा हा प्राणी आढळून आल्यानंतर वनविभागाने तातडीने ठाणेपाडा, अजेपूर तसेच नवापुर तालुक्यातील गावांमध्ये बैठका घेऊन ‘लोकसंवाद’ हा कार्यक्रम घेणार या माध्यमाने उन्हाळ्यात येथे स्थलांतरित होणाºया प्राण्यांची सुरक्षितता आणि वनक्षेत्रात वणवा पेटू नये यासाठी घेण्यात येणारी दक्षता याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़ सहायक वनसंरक्षक जी़आऱ रणदिवे हे त्या-त्या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधणार असून वन्यप्राणी संवर्धनासाठीच्या उपायांची माहिती देतील़

आढळून आलेले काळवीट हे ब्लॅक बक या दुर्मिळ प्रजातीतील आहे़ १९७२ व्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ब्लॅक बक हा प्राणी श्रेणीमध्ये अतीसंरक्षित आहे़ त्याची शिकार केल्यास आजन्म कारावासासारख्या शिक्षेची तरतूद आहे़ प्रामुख्याने शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानावर फिरणारा काळवीट अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकुरी काळविट अभयारण्यात तसेच पुणे, सोलापूर जिल्ह्यात आढळतो़ त्याव्यतिरिक्त आता नंदुरबारात ही दुर्मिळ प्रजाती आढळली आहे़ साधारण ३६ किलो वजन व १़२ मीटर लांबी असलेला हा प्राणी त्याच्या शिंग आणि चामड्यासाठी प्रसिद्ध असल्याने संरक्षित म्हणून गणला जातो़ आढळून आलेली काळवीट ही मादी असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे़ भुऱ्या रंगाची विना शिंगाची मादी तर काळ्या रंगाचा मोठी शिंगे असलेला नर असतो़ या प्राण्याला अत्यंत संरक्षित म्हणून केंद्र शासनाने यापूर्वीच घोषित केले आहे़

मुख्यत्त्वे करुन गवत, फळ, फुले यासह विविध वनस्पती हे या ब्लॅक बकचे मुख्य अन्न आहे़दरम्यान ठाणेपाडा येथील जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांनीही या प्रजातीच्या आढळून येण्याबाबत आनंद व्यक्त केला असून वनव्यवस्थापन समित्या त्याच्या संरक्षणासाठी वनविभागाला सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे़ठाणेपाडा वनक्षेत्रात यापूर्वी काळवीटांचा रहिवास असल्याचे परिसरातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे़ १८ व्या शतकात येथे काळवीट अस्तित्त्वात असल्याचे सांगण्यात आले आहे़