सारंगखेडा येथे रांगोळी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:28 IST2019-12-18T12:28:16+5:302019-12-18T12:28:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये विविध स्पर्धा सुरू असून मंगळवारी राज्यस्तरीय ...

Rangoli tournaments at Sarangkheda | सारंगखेडा येथे रांगोळी स्पर्धा

सारंगखेडा येथे रांगोळी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये विविध स्पर्धा सुरू असून मंगळवारी राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई येथील कलाकारांनी लावणीचा कार्यक्रम सादर केला.
चेतक फेस्टीलवमध्ये घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसाठी १५० स्पर्धकांकडून आपल्या कलेचे सादरीकरण मागवून त्यातील ३० स्पर्धकांची अंतिम चाचणीसाठी निवड करण्यात आली. त्यात मुंबई, पुणे, नागपूर, लातूर, मालेगाव, पनवेल, नाशिक, पाचोरा, शहादा येथील स्पर्धकांनी अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी ‘चेतकोत्सव एक अभिनव यात्रा’ हा विषय ठेवण्यात आला होता. कलाकारांनी मंगळवारी भव्य हॉलमध्ये रांगोळीचे रेखांकन केले. चार बाय तीन फुटाची रांगोळी काढण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण रात्री उशिरापर्यंत सुरू होते. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २१, १५ व ११ हजार रुपयांचे बक्षीस तर उत्कृष्ट रंगसंगती व उत्कृष्ट संकल्पना या रांगोळींना पाच हजार रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचे नियोजन चतुर्भुज शिंदे व नीलेश पाटील यांनी केले होते.
लावणीचा बहारदार कार्यक्रम
चेतक फेस्टीवलमध्ये यात्रेकरुंसाठी विनामूल्य विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. खान्देशी तडका या अहिराणी गीतांच्या कार्यक्रमानंतर मंगळवारी मुंबई येथील साधना जोशी प्रस्तुत लावणीचा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी प्रेक्षक गॅलरी हाऊसफुल्ल झाली होती.

Web Title: Rangoli tournaments at Sarangkheda