शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा परिसरात पावसामुळे घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 11:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा व परिसरात गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू आहे. यामुळे अनेक घरांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा व परिसरात गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू आहे. यामुळे अनेक घरांची पडझड होवून घरांना गळती लागली आहे.सारंगखेडा व परिसरात दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने अनेक घरांना गळती लागली आहे व घरेही कोसळू लागले आहेत. यात सारंगखेडा व परिसरातील घरे कोसळू लागली आहेत. तर पक्की घरेदेखील पाझरू लागली आहेत. दरम्यान या पावसामुळे कापूस पिकालाही मोठा फटका बसत आहे.परिसरातील सारंगखेडा, कु:हावद, पुसनद, बिलाडी, बामखेडा, कळंबू आदी सपाटीवरील भागातील शेतशिवारात कापूस, मका, मूग, सोयाबीन, बाजारा आदी पिके पाण्याखाली असल्याने ती पिके जास्त पाण्यामुळे पूर्णत: वाया जाण्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्याचबरोबर मुलाची तोडणी करण्यासंदर्भात शेतक:यांना पावसाचा मोठा व्यत्यय येत आहे. मुगाच्या शेंगा जास्त पाण्याने फुगून वाया जात आहे.  शेतक:यांच्या तोंडाचा घासच निसर्ग जणू हिरावतो आहे, अशी स्थिती आहे. उन्हाळी कापसाची बोंडे बुरशी लागून वाया जात आहेत.या संततधार पावसाने सारंगखेडा व परिसरातील घरे कोसळू लागले आहेत. अनेक घरांना गळती लागली असून, रात्री झालेल्या पावसात सारंगखेडा येथील एका घराच्या मागील भाग पूर्णत: कोसळला. यात शौचालय व स्वच्छता गृहाचेही नुकसान झाले. त्याचप्रमाणे इतर सामानही यात दाबल्या गेल्याचे नुकसान झाले आहे. या पावसाने नालेही वाहत आहेत. परिसरातील लहान मोठे पाझर तलावही पूर्णपणे ओव्हरफ्लो झाले असून, सारंगखेडा बॅरेजचे पाच गेट उघडले असल्याने तापी नीदही दुथडी भरून वाहत आहे. या पावसामुळे पक्की घरेही पाझरायला लागली आहेत.