सारंगखेडा येथे झन्नामन्ना क्लबवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:45+5:302021-07-30T04:32:45+5:30

सारंगखेडा-शेल्टी रस्त्यावर गावानजीक एका पत्र्याच्या शेडमध्ये झन्नामन्ना पत्त्यांचा जुगार चालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ ...

Raid on Zannamanna Club at Sarangkheda | सारंगखेडा येथे झन्नामन्ना क्लबवर धाड

सारंगखेडा येथे झन्नामन्ना क्लबवर धाड

सारंगखेडा-शेल्टी रस्त्यावर गावानजीक एका पत्र्याच्या शेडमध्ये झन्नामन्ना पत्त्यांचा जुगार चालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ धाड टाकली. त्यात काही जण जुगार खेळत असल्याने त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३१ हजार ८५० रुपये रोख, २८ हजार रुपये किमतीचे चार मोबाइल, ७७ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकल, जुगाराची साधने असा एकूण एक लाख ४३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी इद्रीस खान युनूस खान पठाण (३६, रा. हरियाली इस्टेट, शहादा), संतोष जानकीराम मराठे (३२, रा. डाबरी, दोंडाईचा), संभाजी विठ्ठल पाटील (४५, रा. शिरडाणे, ता.जि. धुळे), भोलेश्वर प्रभाकर गिरासे (२५, रा. होळनाथे, ता. शिरपूर) यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी हे करीत आहेत.

Web Title: Raid on Zannamanna Club at Sarangkheda