नंदुरबार व नवापूर येथे जुगार अड्डयांवर धाड, १८ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:18 IST2020-08-14T12:17:55+5:302020-08-14T12:18:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथे जुगार अड्डयावर टाकलेल्या धाडीत १८ जणांवर कारवाई करून अडीच लाखाचा ...

Raid on gambling dens in Nandurbar and Navapur, crime against 18 persons | नंदुरबार व नवापूर येथे जुगार अड्डयांवर धाड, १८ जणांवर गुन्हा

नंदुरबार व नवापूर येथे जुगार अड्डयांवर धाड, १८ जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथे जुगार अड्डयावर टाकलेल्या धाडीत १८ जणांवर कारवाई करून अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील रोकडेश्वर व्यायाम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू होता. त्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेला मिळाली. तेथे धाड टाकली असता दहाजण जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याजवळून ७७ हजार ८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात पाच मोबाईल व रोख रक्कम याचा समावेश आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे कर्मचारी राकेश मोरे यांनी फिर्याद दिल्याने गौरव संजय चौधरी, विजय चंद्रकांत मुळे, प्रमोद चुडामन पाटील, विशाल नाना कुंभार, योगेश कन्हैयालाल राजपूत, संदीप मोहन मोरे, सुनील पंडित भोई, आतिष राजेंद्र मराठे, गोपाल जयराम भोई व किशोर सुकऱ्या ठाकरे सर्व रा.नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रवींद्र पवार करीत आहे.
दुसरी घटना नवापूर येथे घडली. शहरातील धनलक्ष्मी पार्कमधील घराच्या पहिल्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी जुगार चालू असल्याची माहिती मिळताच पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. तेथे मनोज मधुकर वळवी, अय्युब सलीम शेख, रईस रशीद शेख, विपूल उर्फ सुरज अश्विन जयस्वाल, सर्व रा.नवापूर, शोएब युसूफ पठाण, नितीन भगूभाई चौधरी, राकेश मावजीभाई डिंबर रा. बाजीपूर, ता.तापी, कांतीलाल मधुकर जाधव, रा.जमादारफळी, ता.तापी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात रोख रक्कम व मोबाईल यांचा समावेश आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी आदिनाथ गोसावी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक शिंपी करीत आहे.

Web Title: Raid on gambling dens in Nandurbar and Navapur, crime against 18 persons