शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेमडीसीवर इंजेक्शन खरेदीसाठी शहाद्यात रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

नंदुरबार व धुळे जिल्हा कोरोना विषाणू संक्रमणाचा विस्फोट झाल्याने दिवसेंदिवस बाधितांची संख्या कमालीची वाढत आहे. बाधित रुग्णांना उपचारासाठी ...

नंदुरबार व धुळे जिल्हा कोरोना विषाणू संक्रमणाचा विस्फोट झाल्याने दिवसेंदिवस बाधितांची संख्या कमालीची वाढत आहे. बाधित रुग्णांना उपचारासाठी पहिल्या दिवशी रेमडीसीवर इंजेक्शनचा डोस द्यावा लागतो. त्यानंतर किमान सहा इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करावा लागतो. यामुळे या इंजेक्‍शनची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र इंजेक्शनचा तुटवडा असल्याने गरजूंना उपचारासाठी चढ्या भावाने खरेदी करावी लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही विक्रेत्यांकडून चक्क दोन ते चार हजार रुपये या दराने या इंजेक्शनची विक्री झालेली आहे. एकीकडे या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आलेले आहे तर दुसरीकडे त्याचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केलेली नसल्याने गरजूंना ते काळाबाजारातच खरेदी करावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार अमरिशभाई पटेल यांच्या माध्यमातून सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष दीपक पटेल यांच्या सहकार्याने पी.के. अण्णा फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच आमदार राजेश पाडवी यांनी ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर शनिवारपासून शहाद्यात हे इंजेक्शन अवघ्या ७७७ रुपयाला उपलब्ध करून दिले आहे. अगदी स्वस्तात व सहजरित्या हे इंजेक्शन मिळत असल्याने शनिवारपासून त्याच्या खरेदीसाठी बाधितांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्या दिवशी एक हजार व्हायल विक्री झाल्या तर दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळपासूनच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी विक्रमी गर्दी केली होती.

अहमदाबाद येथील कॅडीला या औषध कंपनीमधून या इंजेक्शनची खरेदी करण्यात येत असून त्यासाठी शासकीय नियमांची पूर्तता करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेला हे इंजेक्शन सहजरीत्या उपलब्ध व्हावे यासाठी पी.के. अण्णा फाउंडेशनने हा उपक्रम राबविला आहे. पुढील काही दिवस नियमित राबविला जाईल. याचा फायदा कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी होणार असून हे इंजेक्शन फक्त गरजूंनी खरेदी करावे. या इंजेक्शनचा होत असलेला काळाबाजार रोखण्यासाठी तसेच नागरिकांना आर्थिक भुर्दंडापासून वाचविण्यासाठी हा उपक्रम राबविला असल्याची माहिती फाऊंडेशनचे सचिव प्रा.मकरंद पाटील यांनी दिली.

दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून रेमडीसिवर या इंजेक्शनची विक्रमी विक्री झाली आहे. शुक्रवारपर्यंत या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना पैसा खर्च करावा लागला. आता सहजरित्या हे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने तालुक्यात खरोखरच कोरोना संक्रमणाची परिस्थिती भयावह झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शासनाने कोविड सेंटरसह इतर औषध विक्रेत्यांकडे व स्वयंसेवी संस्थांकडे ७७७ रुपयात अथवा त्यापेक्षा कमी किमतीत हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे व नागरिकांची वणवण भटकंती थांबविण्यासह त्यांचे आर्थिक नुकसान टाळावे यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरत आहे.