शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईनसोबतच स्थलांतरीत मजूरांचीही तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 13:07 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील आमलाड येथे आदिवासी मुलांच्या वसतीगृहात १०० बेडचे सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज ...

वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील आमलाड येथे आदिवासी मुलांच्या वसतीगृहात १०० बेडचे सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे़ याठिकाणीच गुजरात मधून आलेल्या शेकडो मजुरांचीदेखील आरोग्य तपासणी केली जात आहे. यात शहादा, धडगाव तालुक्याचीच अधिक संख्या असते. त्यामुळे यंत्रणेवरदेखील मोठा ताण पडत आहे. यासाठी चेकपोस्टावरूनच विगतवारीसाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी आरोग्य प्रशासनाबरोबरच महसूल प्रशासन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. या संशयित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आमलाड येथील शासकीय मुलांच्या वसतीगृहात विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. यासाठी तीन इमारतींमध्ये साधारण शंभर बेड तयार करण्यात आले आहे. प्रत्येक रूग्णाला स्वतंत्र मेडिकल कीट, पुरेशा औषधी दिल्या आहेत. त्यामुळे दिवसातून तीन वेळा दाखल रूग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत ३२ रूग्ण विलगीकरण कक्षात दाखल आहेत. यापूर्वी ५२ रूग्ण बरे होऊन डिसचार्ज झाले आहेत. रूग्णांना वापरासाठी मुबलक पाणी व पिण्यासाठीही फिल्टर पाण्याचे ड्रम उपलब्ध करून देण्यात आल्याचे दिसून आले. त्यांच्या जेवना करीता बाहेरील उपहारगृहातून व्यवस्था करण्यात आली असून, हे जवळही तपासल्याचे दिसून आले होते.तिन्ही इमारतीत दिवसातून दोनवेळा औषध फवारणीतून निर्जंतुकीकरण कर्मचारी करत होते. सोयी, सुविधांबाबत प्रत्यक्ष रूग्णांना विचारले असता पुरेशा सुविधा, नियमित आरोग्य तपासणी, मुबलक पाणी, चांगले जेवण दिले जात असल्याचे बोलून दाखविले होते.या विलगीकरण कक्षात आरोग्य विभागातील १०५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी रोटेशन पद्धतीने आपली सेवा बजावित आहेत. यात आरोग्ळ अधिकारी, वद्यकीय अधिकारी, सामुदायिक अरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहाय्यक, औषधनिर्माण अधिकारी, शिपाई आदींचा समावेश आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना निवासा करीता स्वतंत्र दोन खोल्या देण्यात आल्या आहेत. या कक्षात वाररूमदेखील तयार करण्यात आला अूसन, महसूल, पोलीस, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, भूमिअभिलेख, आदिवासी प्रकल्प या विभागाच्या कर्मचाºयांची ड्युटी लावली आहे. वॉर रूममध्ये कर्मचारी आढळूनही आले होते. त्याच बरोबर तेथील वैद्यकीय कर्मचाºयांना जिल्हा परिषदेने साधारण ५० किट्स उपलब्ध करून दिले आहे. एकूणच विलगीकरण कक्ष सर्व सोयी सुविधांनी युक्त असला तरी या कक्षात आरोग्य तपासणीसाठी गुजरातमधून स्थलांतर करणारे शेकडो मजूर येत आहे.सोमवारी सकाळी तब्बल ४०० मजुरांनी कक्षात तपासणी करण्यासाठी गर्दी केल्याचे विदारक चित्र दिसून आले होते. विशेष म्हणजे धडगाव व शहादा तालुक्यातील मजूरही थेट येथेच गर्दी करतात. मजुरांच्या या गर्दीमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. शिवाय या गर्दीमुळे संसर्गाचा धोका वाढण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.हे मजूर गुजरामधून येत असताना सीमेवर त्यांची तपासणी केली जात असते. तेथेच वाहनचालकांना थेट संबंधीत तालुक्यातील आरोग्य केंद्रांना जाण्याची सूचना केली पाहिजे. तसेच तेथेच विगतवारी केली तर मजूरही थेट आपापल्या केंद्राकडे जातील. मात्र यासाठी वरिष्ठ प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.एक हजार ७०० जणांना केले होमक्वॉरंटाईनतळोदा येथील विलगीकरण कक्षातून गुजरात अथवा इतर भागातून आलेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अशा एक हजार ७०० जणांना होमक्वॉरंटाईन करण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणेने दिला आहे. असे असले तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नसल्याचे म्हटले जात आहे. विशेषत: ग्रामीण भागात हे चित्र पहावयास मिळत असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत सर्वच यंत्रणांच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाला तळोदा तालुक्यात रोखण्यास यशस्वी झाले आहे. मात्र आता मजुरांची व विद्यार्थ्यांची ट्रॅव्हलींग हिस्ट्री वाढली आहे. साहजिकच अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.