शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी दोन लाख ३० हजार क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : या हंगामात शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने सीसीआयच्या माध्यमातून दोन लाख ३० हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : या हंगामात शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने सीसीआयच्या माध्यमातून दोन लाख ३० हजार क्विंटल कापसाची खरेदी केली. त्यापोटी १२४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. तालुका पातळीवर कमी कालावधीत सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून राज्यात सर्वप्रथम ठरली असल्याची माहिती सभापती सुनील पाटील यांनी दिली.चालू हंगामात कापसाचे दर केंद्र शासनाने प्रती क्विंटल पाच हजार ४५० रुपये जाहीर केले होते. मात्र हंगामाच्या सुरूवातीपासून बाजारात कापसाचे दर हमी भावापेक्षा कमी होते. त्यामुळे भारतीय कपास निगम (सी.सी.आय.) यांच्याकडील मार्गदर्शक सूचनेनुसार बाजार समितीने १५ नोव्हेंबर २०१९ पासूनच तालुक्यातील शेतकºयांची कापूस खरेदी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे शेतकºयांना कापसाला योग्य किंमत प्राप्त होणार होती. १५ नोव्हेंबर २०१९ ते कोरोनामुळे जाहीर झालेला जनता कर्फ्यू अर्थात २२ मार्च २०२० पावेतो कापसाची खरेदी नियमित सुरू होती. या कालावधीत तालुक्यातील शेतकºयांचा एक लाख ७८ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली होती व त्यापोटी शेतकºयांना ९७ कोटींची रक्कम अदा करण्यात आली. त्यानंतर कोवीड-१९ मुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याने कापूस खरेदी बंद झाली.त्यानंतर १७ एप्रिल २०२० रोजीच्या पत्रानुसार राज्य शासनाने कोरोना संदर्भात विशेष काळजी घेऊन कापूस खरेदी करण्यास परवानगी दिली व यासंदर्भात जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी संबंधितांची बैठक आयोजित करून आवश्यक ते मार्गदर्शन व सूचना केल्या. जिल्हा उपनिबंधक यांनी शहादा तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत कापूस विक्रीसाठी शिल्लक असलेल्या दोन हजार ३७३ शेतकºयांची यादी बाजार समितीस उपलब्ध करून दिली. समितीस उपलब्ध झालेल्या यादीनुसार ४ मे २०२० पासून प्रत्यक्षात कापूस खरेदी पूर्ववत सुरू झाली. ही खरेदी सुरू असताना उपलब्ध असलेल्या यादीत काही नावे बोगस असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी २६ मे २०२० रोजी खरेदी केंद्रास दिलेल्या भेटीदरम्यान समितीचे सभापती सुनील पाटील यांनी उपलब्ध असलेल्या यादीचा गावनिहाय तलाठी यांच्यामार्फत पंचनामा करून देण्याबाबत विनंती केली असता जिल्हाधिकाºयांनी त्याचक्षणी जागेवरच पंचनामा करण्याबाबत तहसीलदार यांना सांगितले. त्यानंतर तहसीलदार यांनी पंचनामा करून बाजार समितीस नव्याने याद्या उपलब्ध करुन दिल्या. ज्यामध्ये बरीचशी बोगस नावे कमी झालेली होती. यामुळे पुढील कापूस खरेदी सुरळीत पार पडली. २२ जून २०२० रोजी सायंकाळपावेतो शहादा तालुक्यातील सर्व शेतकºयांची कापूस खरेदी पूर्ण झाली आहे. लॉकडाऊननंतर ५१ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. त्यापोटी शेतकºयांना २८ कोटी रक्कम अदा करण्यात आली आहे. अशी एकूण कापूस खरेदी दोन लाख ३० हजार क्विंटल झाली असून एकूण १२४ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यात परस्पर जमा झाली आहे.कापूस खरेदीदरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, उपविभागीय अधिकारी शहादा, तहसीलदार व सहायक निबंधक शहादा यांनी वेळोवेळी खरेदी केंद्रास भेटी देऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच सी.सी.आय. केंद्र चालक अरुण भाडाईत, श्रीजी कोटेक्सचे अजय गोयल व राधीका कॉटनचे कैलास पाटील यांच्यासह बाजार समितीचे सचिव व इतर कर्मचाºयांनी खरेदीसाठी मेहनत घेतली. या सर्वांचे बाजार समितीचे मार्गदर्शक व संचालक दीपक पाटील, सभापती सुनील पाटील यांनी कौतुक केले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनीही बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, बाजार समिती व्यवस्थापन, सी.सी.आय. केंद्रचालक अरुण भाडाईत यांचे पत्राद्वारे कौतुक केले आहे.बाजार समितीने १५ नोव्हेंबर पासूनच तालुक्यातील शेतकºयांची कापूस खरेदी करण्यास सुरूवात केली होती. २२ मार्चपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत कापसाची खरेदी नियमित सुरू होती. या कालावधीत तालुक्यातील शेतकºयांचा एक लाख ७८ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यापोटी शेतकºयांना ९७ कोटीची रक्कम अदा करण्यात आली.लॉकडाऊन कालावधीत ५१ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यापोटी शेतकºयांना २८ कोटी रक्कम अदा करण्यात आली आहे. अशी एकूण दोन लाख ३० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली असून, त्यापोटी १२४ कोटी रक्कम शेतकºयांच्या खात्यात परस्पर जमा झाली आहे.