वाण्याविहीर येथे लसीकरणासाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST2021-05-05T04:49:43+5:302021-05-05T04:49:43+5:30

ग्रामस्थांमध्ये प्रबोधन, जनजागृतीसाठी केंद्रप्रमुख मोहन बिस्नोरिया, प्राचार्य दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह सातपुडा वैभव माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक घरोघरी जाऊन ...

Public Awareness for Vaccination at Vanyavihir | वाण्याविहीर येथे लसीकरणासाठी जनजागृती

वाण्याविहीर येथे लसीकरणासाठी जनजागृती

ग्रामस्थांमध्ये प्रबोधन, जनजागृतीसाठी केंद्रप्रमुख मोहन बिस्नोरिया, प्राचार्य दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह सातपुडा वैभव माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक घरोघरी जाऊन जनजागृती करत लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन करीत आहेत. नंदुरबार हा आदिवासीबहुल लोकवस्तीचा जिल्हा आहे. साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने सोशल मीडियावर कोरोना प्रतिबंधक लससंदर्भात अनेक गैरसमज पसरविणाऱ्या पोस्ट येत असल्याची माहिती दिली जात आहे. यातून ग्रामीण भागातील गरीब जनता अगोदरच धास्तावलेली आहे. यातून लसीकरणासाठी अनेक जण स्वत:चा मोबाईलही देत नसल्याने शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वाण्याविहीर परिसरात शिक्षकांचे पथक सातत्याने भेटी देत नागरिकांना लसीकरणासाठी तयार करत आहेत. मोहन बिस्नोरिया, संजय राणे, एस. बी. मगरे, डी. पी. राठोड, व्ही. के. पाटील, जे. एम. सूर्यवंशी यांच्यासह शिक्षकांचा यात सहभाग आहे.

Web Title: Public Awareness for Vaccination at Vanyavihir