रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन व बेड उपलब्ध करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:36+5:302021-04-02T04:31:36+5:30

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात अनेक रुग्णांना ऑक्सिजन, सिलिंडरची गरज भासत आहे; परंतु शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर ...

Provide oxygen and beds in hospitals | रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन व बेड उपलब्ध करावेत

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन व बेड उपलब्ध करावेत

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात अनेक रुग्णांना ऑक्सिजन, सिलिंडरची गरज भासत आहे; परंतु शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर व बेड कमी पडत आहेत. अनेक रुग्णांचा ऑक्सिजन सिलिंडर व बेडअभावी गुदमरुन मृत्यू होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत; परंतु वैद्यकीय उपचार यंत्रणा कमी पडत असल्याने कोरोना रुग्णांचे फार हाल होत आहेत. परिणामी रुग्णांना दीडशे किलोमीटर सुरत, व्यारा, धुळे येथे जाण्याची वेळ येत असून तेथे अव्वाच्या सव्वा खर्च होत आहे. जे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. यावर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. या कोरोना काळात डॉक्टर चांगल्या पद्धतीने काम करीत असले तरी त्यांच्यापुढे अनेक समस्या येत असून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात बेड व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. ऑक्सिजन व बेडची तातडीने सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सुमानसिंग राजपूत, चेतन राजपूत, जय हिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहितसिंग अशोक राजपूत, सदस्य निष्णा कुवर, हेमंत पाटील, अक्षय कोकणी, कल्पेश राजपूत, दिनेश कोकणी, योगेंद्र रावल आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Provide oxygen and beds in hospitals