शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांवर प्रकल्पधिकाऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत चालवल्या जाणाºया आश्रमशाळांमध्ये प्रकल्पाधिकारी वसुमना पंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत चालवल्या जाणाºया आश्रमशाळांमध्ये प्रकल्पाधिकारी वसुमना पंत आणि अविशांत पांडा यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत मध्यरात्री भेटी दिल्या़ दोघांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात दिलेल्या भेटीमुळे आश्रमशाळांवर एकच गहजब झाला़ या तपासणीदरम्यान १३ जणांवर कारवाई क२ाण्यात आली़नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाºया नवापुर, शहादा व नंदुरबार तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रशासन, गुणवत्ता आणि व्यवस्थापन यात सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी सहायक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, सहायक लेखाधिकारी किशोर गोसावी, कार्यालय अधिक्षक भानुदास वसावे, शिक्षण विस्तार अधिकारी सी़जी़पाटील, प्रकाश वसावे, निर्मल माळी, सुनील पाटील, रविंद्र निकम, सुभाष पाटील यांच्यासह गुरुवारी सायंकाळनंतर प्रकल्पांतर्गत तीन तालुक्यातील २२ आश्रमशाळांना भेटी दिल्या़ रात्री दोन वाजेपर्यंत ही तपासणी सुरु होती़या भेटीदरम्यान मुख्यालयी न थांबणारे मुख्यापक, अधिक्षक व कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई केली़ या कारवाईमुळे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांची एकच धावपळ उडाली होती़ अनेक ठिकाणी कर्मचारीच आढळून आलेले नसल्याने कारवाई करण्यात आली आहे़ नंदुरबार प्रकल्पात तब्बल १३ जणांवर कार्यालयीन कामकाजात कुचराई केल्याचा ठपका ठेवल्याची माहिती देण्यात आली आहे़ प्रकल्पाधिकारी पंत आणि पांडा यांनी शुक्रवारी रात्रीही काही ठिकाणी तपासणी करण्यात आल्याची माहितीतळोदातळोदा प्रकल्पातील धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील आश्रमशाळांवर प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांनी भेटी दिल्या़ सहायक प्रकल्प अधिकाºयांसह चार पथक बनवून त्यांनी शुक्रवारी पहाटेपर्यंत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात तसेच तळोदा तालुक्यातील एकूण २० आश्रमशाळांची तपासणी करण्यात आली़ या भेटीदरम्यान दुर्गम भागात कर्मचारीच हजर राहत नसल्याचे भीषण वास्तव पुन्हा नव्याने समोर आले आहे़ अविशांत पांडा यांनी आश्रमशाळांचे व्यवस्थापन, शिस्त व कामकाजाची माहिती घेतली. भेटीत गैरहजर मुख्याध्यापक, अधीक्षक व कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई केली़मोहिमेत प्रकल्प अधिकारी पांडा यांच्यासह सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर, एन.डी. धनगर, एस.डी. दोमकोंडेकर, शैलेश पाटील, एस.एम. चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी एन.डी. ढोले व बबनराव मुगळे हे सहभागी झाले होते़