शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

शादी डॉट कॉमवरील प्रोफाईल महिलेला पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शादी डॉट कॉमवर टाकलेले प्रोफाईल कळंबू येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले. लग्नाचा प्रस्ताव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शादी डॉट कॉमवर टाकलेले प्रोफाईल कळंबू येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले. लग्नाचा प्रस्ताव देत अमेरिकेतील एकासह दिल्ली येथील महिलेने एक लाख ८ हजार ४०० रुपयांमध्ये महिलेची आॅनलाईन फसवणूक केली. दोघांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळंबू येथील नोकरदार असलेल्या ३२ वर्षीय महिलेने शादी डॉट कॉम या अ‍ॅप्सवर आपले प्रोफाईल टाकले होते. अमेरिकेतील सायरिया येथील दिपक अरुण असारकर यांनी प्रोफाईलवरील मोबाईल क्रमांकावरून महिलेशी संपर्क साधला. व्हॉट्सअपवर चॅटींग करून प्रोफाईल आवडल्याचे सांगितले, शिवाय विवाहाचा प्रस्ताव देखील ठेवला. यानिमित्त पाच हजार डॉलर गिफ्ट म्हणून पाठविले आहे. त्याची किंमत भारतीय चलनात ४ लाख ५४ हजार ५८७ रुपये असल्याचे सांगितले. ते पैसे खात्यात येण्यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. त्यासाठी दिल्ली येथील बँकेत असलेल्या एका महिलेचा मोबाईल नंबर दिला. तिच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले. दिल्ली येथील महिलेने भारतीय चलनाच्या रक्कमेपोटी चार्ज म्हणून कळंबू येथील महिलेकडून वेळोवेळी एकुण एक लाख ८ हजार ४०० रुपयांची रक्कम आॅनलाईन मागविली.रक्कम जमा झाल्यावर मात्र अमेरिकेतील दिपक असारकर या युवकाने व महिलेने संपर्क साधणे बंद केले. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर महिलेने सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांविरुद्ध फसवणूक आणि माहिती, तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहे.