सर्वोदय विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:19+5:302021-02-14T04:29:19+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव तथा प्राचार्य ए.के. पटेल होते. यावेळी उपमुख्याध्यापक धर्मा चौधरी, पर्यवेक्षिका पुष्पा पटेल, खाजगी प्राथमिक ...

Pride of meritorious students in Sarvodaya Vidyamandir | सर्वोदय विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सर्वोदय विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव तथा प्राचार्य ए.के. पटेल होते. यावेळी उपमुख्याध्यापक धर्मा चौधरी, पर्यवेक्षिका पुष्पा पटेल, खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज पटेल, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, लता शिरसाठ, अर्जुन पटेल, शिक्षक पालक संघाचे सदस्य महेंद्र बोरदे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात पहिली ते बारावीच्या वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, विविध विषयांत प्रथम येणारे विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी, शासकीय चित्रकला परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, स्काऊटचा राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, निवडणूक काळात अंध-अपंग, वृद्ध, व्हीलचेअरवर बसून मतदान केंद्रापर्यंत आणले. स्कॉऊटचे विद्यार्थी यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात कोरोना योद्धा शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी ए.के. पटेल म्हणाले की, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले नाही त्यांनी आता अजून जोमाने अभ्यास करावयाचा आहे व पुढील वर्षी बक्षीस घेण्यासाठी सज्ज व्हायचे आहे, असे सांगितले.

Web Title: Pride of meritorious students in Sarvodaya Vidyamandir