शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात होलिकोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होलिकोत्सव हा साधेपणाने होणार आहे. साधेपणातही होळीचा उत्साह कायम आहे. दुर्गम भागात मधुर गीते गायनाच्या ...

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होलिकोत्सव हा साधेपणाने होणार आहे. साधेपणातही होळीचा उत्साह कायम आहे. दुर्गम भागात मधुर गीते गायनाच्या सराव सुरु झाला असून सातपुड्याच्या द-या-खो-यात ढोल, डफ च्या तालावर होळी गीताच्या मधुर सुरात मुली व महिला नाचण्याच्या सरावात लागले आहे. सातपुड्यात आदिवासी बांधव परंपरागत वेशभूषेत विविध सण साजरा करतात. गावदिवाळी, इंदलपुजन, वाघदेव, भोंगर्या , खोडपुजन, ओखडा, नवाय पुजन, बारामेद्य ,गिंबदेव कणी पुजन,याहा मोगी पुजन, महाशिवरात्री,निलचारी,होळी असे पारंपरिक सणाची विधीवत पद्धतीने पूजन करून साजरे केले जातात. त्यातच होळी सणाला मोठे असुन, मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा होतो. आदिवासी बोली भाषेत होळी सणाला ओली महिना म्हणतात. या ओलीच्या महिन्यात साहित्याची जुळवाजुळव करीत होळी सणासाठी मागणी असणाऱ्या विविध साहित्य बनविण्यात सध्या आदिवासी बांधव व्यस्त आहेत.

अतिदुर्गम भागातील साकलीउमरचा आमराईपाडा येथे रमेश वसावे, रायसिग पाडवी, सुमना पाडवी हे बाबुंपासुन वेगवेगळ्या वस्तू तयार करत आहेत. हस्त व कला कौशल्य या निसर्गाचा देणगीचा वापर करीत होळीसाठी मोरपीसच्या टोपी विणत असतात मार्च महिन्यात होळी म्हणजे आदिवासी भाषेत ओली महिना चंन्द्र नविन दिसतात. त्या दिवसापासुन नमस्कार करीत मोरखी बनत असलेला मनुष्य समाजात कडक नियमांची पाळणी करत आहेत. सणानिमित्त पाळणी करणारे मोरखी, बावा, जनखाडोक, नागरामोरखी, व टोपी विणणारे सर्व पालन करीत असतात घरातील ज्येष्ठ आई वडील, मुले, मुली, महिला, तसेच पाळीव पक्षी ,पशुधन,यांची आरोग्याची निगा राखावी म्हणून नियमाचे पालन करीत ४५ दिवस नियमाच्या पालनीत राहुन महत्व देतात. आहारात मांसाहर वर्ज्य करतात. खाटेवर न बसता ,न स्पर्श करणे, महिलांना स्पर्श न करणे, ज्या दिवसापासून पाळणी सुरुवात झाली. त्या दिवसापासुन कोणाला वाईट न बोलणे ,चप्पल न घालणे,घरातील पाळीव पशुपक्ष्याची निगा ठेवणे, जेवण स्वत: बनवुन घेत वेगळेच राहत पाळणी करीत असतात.

साकलीउमर च्या आमराईपाडा या गावातील येथे चार पाच कारागीर एकत्र येत मोराच्या पीसापासुन टोपी विनत असून एका टोपीला विण्यात एकास तीन दिवस लागत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. तब्बल ७० काड्या टाकून एक टोपी तयार करण्यात येते. होलिकोत्सवात मोरपीस टोपीला मोठे महत्व आहे. श्रद्धेने मागणी असल्याने दुसऱ्या राज्यातुन ही टोपीला मागणी होत असते.

सातपुड्यातील होळी म्हणजे मानता,पालनी करीत श्रद्धेने नियमात पुजन करीत सातपुड्याची संस्कृती आजही टिकुन आहे. आजच्या मोबाईल युगात सातपुड्यातील गाव पाड्यांवरील नागरिकांना संबध जुडला असला तरी आपली बोलीभाषा,गीते,लोककला,संस्कृती, लोकसंगीत, हस्तकौशल्य ,वस्तुकला,कला,नुत्य,पेहराव,टिकुन आहेत.