शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बागायती कापूस लागवडीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात बागायती कापूस लागवडीची तयारी सुरू झाली आहे. तापी काठालगतच्या गावांमध्ये बागायती कापूस लागवड होते. ...

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात बागायती कापूस लागवडीची तयारी सुरू झाली आहे. तापी काठालगतच्या गावांमध्ये बागायती कापूस लागवड होते. मे महिन्या प्रारंभी तसेच मध्यात विहिरींच्या पाण्याच्या भरवशावर कापूस लागवड सुरू होते. यंदा पाऊस समाधानकारक राहणार असल्याचे संकेत असल्याने लागवडीला गती देण्यात आली आहे.

कारखाने वेगात सुरू

नंदुरबार : शहरातील विविध भागात असलेले मिरची पावडर तयार करणारे कारखाने वेगात सुरू आहेत. कारखानदारांनी मिरची खरेदी करून साठा केला होता. यातून पावसाळ्यापूर्वी मिरचीची पावडर तयार करून त्याची पॅकिंग करण्यावर भर दिला जातो. पावसाळ्यात साठा केलेली मिरची खराब होण्याची शक्यता असल्याने गती दिली जाते.

मार्गदर्शक फलक कधी लागणार

नंदुरबार : जिल्ह्यातून जाणाऱ्या विसरवाडी ते सेंधवा महामार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. कोळदे, ता. नंदुरबार ते खेतियापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. काँक्रिटीकरण असलेल्या या मार्गावर वाहने बेफाम धावत आहेत. दरम्यान या वाहनांवर लगाम लावण्यासाठी विविध सूचना फलक, वाहतूक नियमावली तसेच गावदर्शक फलक मात्र लागलेले नाहीत. यातून मार्गावर अपघातही वाढल्याचे दिसून आले आहे.

पथदिवे बंद

नंदुरबार : शहरातील म्हाडा काॅलनीतील काही पथदिवे बंद असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच काही पथदिवे हे झाडांमध्ये अडकल्याने रस्त्यांवर पडणारा दिव्यांचा प्रकाश कमी झाला आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष

नंदुरबार : शहरातील काशिबा गुरव चाैक ते बायपास रोडवरील संत सेना महाराज चाैकापर्यंतच्या नवीन रस्त्यालगत अवैध व्यवसाय सुरू आहेत. याठिकाणी अवैध मद्य विक्री सुरू असून याकडे पोलीस ठाण्याकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही कार्यवाही झालेली नाही.

खोदकामामुळे चांगल्या रस्त्यांची लागली वाट

नंदुरबार : शहरातील विविध भागात पालिकेने तयार केलेल्या विस्तृत रस्त्यांची नागरिकांकडून वाट लावली जात आहे. अनेक ठिकाणी चांगल्या रस्त्यांना खोदून नवीन पाईपलाईन टाकणे, दुरुस्ती केली जाते. सोबत दूरसंचार विभागाच्या केबल टाकतानाही खोदकाम होते. यातून कोरीट नाका परिसरासह विविध ठिकाणी खोदकाम झाल्याने रस्त्यांची वाट लागली आहे.

गावराणी आंबा आवक

नंदुरबार : तालुक्यासह नवापूर तालुक्याच्या विविध भागात आंबा झाडांवर गावराणी आंबा बाजारात येत आहे. गोल आणि आकाराने लहान असलेल्या या आंब्याला मोठी मागणी असते. सध्या नवापूर चाैफुली व परिसरात आदिवासी महिला टोपले घेऊन गावराणी आंबा विक्री येत आहेत.

फिरते पथक गरजेचे

धडगाव : तालुक्यातील विविध भागात आरोग्य विभागाने फिरते रॅपिड ॲंटिजेन टेस्ट किंवा स्वॅब संकलन केंद्र सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यातून दुर्गम व अति दुर्गम भागातील नागरिकांमधील कोरोनाची भीती दूर होऊन त्यांच्या लसीकरणाचा वेग वाढणार आहे.

व्यापारी स्वेच्छेने हजर

नंदुरबार : शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये विविध व्यवसाय असलेले व्यापारी लाॅकडाऊनमुळे घरी बसून आहेत. यातील काही जणांनी स्वत:च्या आरटीपीसीआर टेस्ट करून घेतल्या असून कोरोनामुक्त असल्याने शासनाने व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची त्यांची मागणी आहे.

खासगी वाहतूक सुरू

नंदुरबार : शहरातून शहादा, तळोदा व इतर तालुक्यात जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहने उपलब्ध आहेत. यातून मोजकेच प्रवासी प्रवास करत असल्याने ही वाहने एकाबाजूने रिकामी परतत आहेत. या वाहनचालकांनी भाडेवाढ केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. ही भाडेवाढ कमी करण्याची गरज आहे.