माहेरी निघालेली गर्भवती रस्त्यातच झाली प्रसूत; गोंडस मुलीला जन्म दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 03:18 IST2020-07-04T03:17:52+5:302020-07-04T03:18:10+5:30

९ महिन्यांची गर्भवती असलेल्या सेमीबाई रणजित वसावे (२५) या सिपाडा (जि़ नर्मदा) येथून भावासोबत दुचाकीने माहेरी तºहावद पुनर्वसन येथे निघाल्या होती़

The pregnant woman gave birth on the street; Gave birth to a cute girl | माहेरी निघालेली गर्भवती रस्त्यातच झाली प्रसूत; गोंडस मुलीला जन्म दिला

माहेरी निघालेली गर्भवती रस्त्यातच झाली प्रसूत; गोंडस मुलीला जन्म दिला

नंदुरबार : गुजरातमधून तºहावद पुनवर्सन (ता़ तळोदा) येथे माहेरी निघालेल्या गर्भवतीला रस्त्यातच प्रसूकळा सुरू झाल्याने तेथील आयाबायांनी धाव घेत साड्यांचा आडोसा करून तिची प्रसुती केली. या मातेने गोंडस मुलीला जन्म दिली. त्यांची सेवासुश्रुषा करून दोघींना माहेरी रवाना केले.

९ महिन्यांची गर्भवती असलेल्या सेमीबाई रणजित वसावे (२५) या सिपाडा (जि़ नर्मदा) येथून भावासोबत दुचाकीने माहेरी तºहावद पुनर्वसन येथे निघाल्या होती़ सोबत त्यांची दोन मुलेही होती़ प्रसूतकळा अधिक वाढल्याने दुचाकी थांबवून त्या थेट रस्त्यातच पडून होत्या.

Web Title: The pregnant woman gave birth on the street; Gave birth to a cute girl