शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा येथे जैन समाजाचे जिनमंदिर व दादावाडीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव प.पू.अवन्ति तीर्थोद्धारक खरतरगच्छाधिपती आचार्य भगवंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा येथे जैन समाजाचे जिनमंदिर व दादावाडीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव प.पू.अवन्ति तीर्थोद्धारक खरतरगच्छाधिपती आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसूरीश्वर म.सा. यांच्या पावन सान्निध्यात उत्साहात झाला. या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.सहा दिवस चाललेल्या या प्राणप्रतिष्ठा महोत्सवास श्री मनितप्रभसागर, श्री समयप्रभसागर, श्री विरक्तप्रभसागरजी, श्री श्रेयांसप्रभसागर, श्री मलयप्रभसागर, श्री मयूखप्रभसागरजी, श्री महितप्रभसागरजी, श्री विमलप्रभाश्री, श्री विश्वर}ाश्रीजी, श्री रश्मिरेखाश्री, श्री चारुलताश्री, श्री चारित्रप्रियाश्री यांचीही उपस्थिती होती. 18 नोव्हेंबरला या महोत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसूरीश्वर म.सा. आदि ठाणा-8 यांच्या आगमनानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर जैन मंदिराच्या प्रांगणात प्रवचन झाले. आचार्य भगवंत यांच्या मंगल प्रवेशाने श्रीमती पंखाबाई जसराजजी चोपडा आराधना भवनाचे उद्घाटन करण्यात आले. 19, 20 व 21  नोव्हेंबर रोजी जिनमंदिर व दादावाडी प्राणप्रतिष्ठाचे विधीविधान श्री जिनकुशलसुरी दादावाडी, कुशलधाम प्रांगणात सकाळी आचार्य भगवंत यांचा निश्रेत आयोध्यानगर व कुशलनगरचे उद्घाटन करून प्राणप्रतिष्ठा महोत्सवास प्रारंभ झाला. दररोज सकाळी व रात्री विविध पूजा व धार्मिक विधान कार्यक्रम झाले. करण्यात आले. 22 नोव्हेंबरला भगवान आदिनाथ यांचा दीक्षा कल्याणकनिमत्ताने अक्कलकुवा शहरात एक इतिहासिक व अवलोकित भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात हत्ती, घोड, उंट, रथ, पालखी, तुतारी पथक, विविध ढोल पथक, आदिवासी  झाकिया आदी पथकांनी सहभाग घेतल्याने शोभायात्रा लक्षवेधी ठरली. त्याचसोबत अक्कलकुवा, खापर, वाण्याविहीर, तळोदा, नंदुरबार, सेलंबा, शहादा, खेतिया, धुळे, दोंडाईचा, अमळनेर  येथून जैन समाजाच्या विविध मंडळांचे सदस्य विविध वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. 23 नोव्हेंबर रोजी अक्कलकुवा शहरातील श्री वासुपूज्यस्वामी जिनमंदिराचा जीर्णोद्धार व श्री आदिनाथ भगवान व जिनकुशलसुरी दादावाडीमध्ये सर्व प्रतिमांची स्थापना करण्यात आली व मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले व महाप्रसाद वाटपाने महोत्सवाची सांगता झाली. मंदिर व दादावाडी निर्माणसाठी सहकार्य करणा:यांचे ट्रस्टतर्फे आभार मानले. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन अॅड.गजेंद्र भंसाली व  शुभम भंसाली यांनी केले. महोत्सवाचे आयोजन श्री मूर्तीपूजक जैन संघ व श्री जिनकुशलसुरी दादावाडी चॅरिटेबल ट्रस्ट अक्कलकुवा यांनी केले होते. महोत्सवासाठी श्री अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषद, अखिल भारतीय खरतरगच्छ महिला परिषद, श्री वासुपूज्य पवित्र महिला मंडळ, ú शांती युवा मंडळ, नवयुवक सुधर्मा मंडळ, सुधर्मा महिला मंडळ, समता युवा संघ, समता महिला मंडळ, भारतीय जैन संघटना आदींसह श्री सकल जैन समाज बांधवांनी परिश्रम घेतले.