शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट पेमेंट बँकेकडून लाॅकडाऊन काळात जिल्ह्यात तीन कोटी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोस्टल विभागाने सुरू केलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेकडून लाॅकडाऊन काळात ग्रामीण भागात अडकून पडलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोस्टल विभागाने सुरू केलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेकडून लाॅकडाऊन काळात ग्रामीण भागात अडकून पडलेल्या नागरिकांना मोठे सहाय्य केले आहे. जिल्ह्यात पोस्ट बँकेचे एकूण ५३ हजार खातेदार असून, या खातेदारांना ३ कोटी रुपयांचे वाटप मे महिन्यापासून अविरत करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्यालय नवापूर येथे करण्यात आले आहे. याठिकाणी पोस्ट खात्याकडून खाती काढण्यात आलेल्या ५३ हजार ग्राहकांच्या खात्यांचे कामकाज करण्यात येते. प्रत्यक्षात घरापर्यंत पोहोचणा-या पोस्टमनच्या आधारे हे कामकाज सुरू करण्यात आले आहे. पोस्टमनकडे असलेल्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून देत घरोघरी असलेल्या खातेधारकांना घरी जावून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. पैसे काढण्याची मागणी, शासनाकडून आलेले पैसे आदीप्रकारे हे कामकाज करण्यात आले आहे. जिल्ह्यात पोस्ट बँकेचे प्रमुख खातेदार हे ग्रामीण भागातील नागरिक, मातृवंदना योजनेच्या महिला लाभार्थी, शालेय विद्यार्थी, आदिवासी आश्रमशाळांचे विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक महाविद्यालयीन विद्यार्थी, रोजगार हमी योजनेत काम करणारे मजूर यासह विविध निराधार योजनांचे लाभार्थी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे या नागरिकांना घराबाहेर न पडता आल्याने तसेच शहरी भागातील बँकांमध्ये येणे शक्य नसल्याने त्यांना घरपोच पैसे देण्यात आले. तब्बल चार महिने खातेदारांना वेळेवर घरी पैसे पोहोचवण्यासाठी पोस्टमन मेहनत घेत होते. नंदुरबार जिल्ह्यातील १३ पोस्टल बिटमधून हे कामकाज सुरू होते. अद्यापही निराधार व शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना या पोस्ट पेमेंट बँकेचा मोठा आधार आहे. पोस्टमनची संख्या कमी असली तरीही वेळेवर रक्कम पोहोचती करण्यासाठी परिश्रम घेतले जात असल्याची माहिती पोस्ट खात्याकडून देण्यात आली आहे. पोस्टल बँकेत दर दिवशी खाते काढणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.गुजरातमध्ये अडकलेल्यांना करता आली मदत पोस्ट पेमेंट बँकेमुळे शहरी भागातील बँकांमध्ये होणारी गर्दी कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. लाॅकडाऊनमध्ये थेट घरपोच पोस्टमन जात असल्याने या योजनेची विश्वासार्हता वाढली. बाहेरगावी असलेल्यांनाही यातून पैसे पाठवणे शक्य असल्याने गुजरातसह महाराष्ट्रातील विविध भागात अडकून पडलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी, तसेच त्यांना किमान पैसे पाठवण्यात पोस्ट बँकेचा मोठा हातभार आहे. या बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून गुजरातमध्ये कामासाठी गेलेल्या व लाॅकडाऊनमुळे उपासमार झेलणाऱ्या अनेकांना पैसे पाठवण्यात येथील ग्रामस्थांना यश आले होते.  

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि डीबीटीची रक्कम घरपोच आदिवासी विद्यार्थ्यांना मंजूर झालेली शिष्यवृत्ती पोस्ट बँकेकडून प्राप्त करता आली. प्रामुख्याने परीक्षा आटोपून घराकडे जाण्यासाठी पैसे नसल्याने ही बँक कामी आली होती. डीबीटीची थकीत रक्कमही या बँकेच्या माध्यमातून अनेकांना गावी मिळाल्याचे सांगण्यात आले.

निराधारांना लाभ झालाजिल्ह्यातील ५३ हजार खातेधारकांना या बँकेचा मोठा लाभ झाला. ट्रान्सफर केलेले पैसे थेट घरपोच जात होते. दुर्गम व अती दुर्गम भागापर्यंत पोस्टमन जात असल्याने विविध योजनांची जमा झालेली रक्कम माता व निराधार वृद्धांना मिळाली. मजूरांना मजूरी प्राप्त झाली.  - बी.एस.जाेशी, पोस्टमास्टर, नंदुरबार. डाक कार्यालय.