शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

राजकारण रंगले ‘लेटरहेड’च्या चर्चेने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 12:38 PM

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राजकारणात काही माणसे अशी असतात ज्यांच्या पदापेक्षा त्यांच्या शब्दाला महत्त्व असते. तर काही ...

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राजकारणात काही माणसे अशी असतात ज्यांच्या पदापेक्षा त्यांच्या शब्दाला महत्त्व असते. तर काही माणसे केवळ पद मिळवून मोठे होण्याचा प्रयत्न करतात. मात्र नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या ओळखीसाठी कुठल्याही पदाची अथवा पक्षाची गरज नाही. तब्बल अडीच दशके राजकारणात आपला वैयक्तिक प्रभाव त्यांनी उमटवल्याने राज्यातील राजकारणात त्यांची वेगळी ओळख झाली आहे. पण असे असतानाही सध्या मात्र त्यांच्या नावाने प्रसिद्धीस दिलेल्या एका ‘लेटरहेड’ची चर्चा मात्र जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.चंद्रकांत रघुवंशी हे सलग तीनवेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. तत्पूर्वी दोनवेळा ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते. त्यांचा हा प्रवास काँग्रेस पक्षात झाला. मात्र वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे साहजिकच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. दरम्यानच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राज्य शासनाने राज्यपालांकडे यादी दिली असून त्यात शिवसेनेतर्फे चंद्रकांत रघुवंशी यांचाही समावेश आहे. मात्र राज्यपालांनी अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. अर्थातच तांत्रिक बाबीमुळे नावे अधिकृतपणे जाहीर झाली नसली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आणि शब्दात रघुवंशी हे आमदार म्हणूनच चर्चेत येतात. परंतु ही चर्चा आणि त्यांच्या आमदारकीच्या नावावर दिलेले पत्र आता कायद्याच्या चौकटीत आणून त्यांच्या राजकीय विरोधकांनी प्रकरणाला नवा रंग दिला आहे.ग्रामपंचायत निवडणूक काळात बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे पत्र चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाने प्रसिद्धीस देण्यात आले. या पत्रावर ‘आमदार चंद्रकांत रघुवंशी’ असे नाव असून त्यावर राजमुद्राही आहे. वृत्तपत्रातून त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या पत्रावर त्यांचे राजकीय विरोधक भाजपचे डॉ.रवींद्र चौधरी व सामाजिक कार्यकर्ते दिनकर पाटील यांनी आक्षेप घेत थेट राज्यपाल व निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आचारसंहितेच्या भंगाबरोबरच रघुवंशी हे आमदार नसताना राजमुद्रा असलेल्या व आमदार लिहीलेल्या पत्रावर हे वृत्त दिल्याने राजमुद्रेचा गैरवापराची तक्रार केली. ही तक्रार केल्यानंतर चंद्रकांत रघुवंशी यांनीही पोलिसांत फिर्याद देऊन आपल्या नावाने व आमदारकीच्या लेटरहेडवर कुणीतरी बोगस लेटरपॅडचा वापर करून निवेदन प्रसिद्ध केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासंदर्भात नंदुरबार शहर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी पुन्हा डिसेंबरमध्ये दिलेल्या अशाच काही इतर विषयासंदर्भातील पत्राचीही तक्रार केली आहे. या तक्रारींची चौकशी होऊन खरे-खोटे काय ते बाहेर येईलच. त्यामुळे हा विषय वेगळा असला तरी सध्या राजकीय गोटात ही चर्चा अधिक चर्चेची ठरली आहे. चंद्रकांत रघुवंशी हे सध्या जाहीर कार्यक्रमांमध्ये कुठे दिसून येत नाहीत. पालिकेच्या इमारतीचा ई-भूमिपूजन सोहळा व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा सोहळाव्यतिरिक्त ते इतर कार्यक्रमांना दिसून आले नाहीत. पण त्यांच्या या कथित पत्रामुळे जिल्ह्याचे राजकारण पुन्हा ‘रघुवंशीं’भोवती केंद्रीत होताना दिसून येत आहे.