पोलीस दलातर्फे गरजुंना किराणा सामानाची किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:19 PM2020-03-28T12:19:52+5:302020-03-28T12:20:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा पोलीस दलतार्फे शहरातील विविध भागात राहणारे मजूर, परप्रांतीय कारागिर यांना किराणा मालाचे किट ...

Police force distributes groceries kit to needy | पोलीस दलातर्फे गरजुंना किराणा सामानाची किट वाटप

पोलीस दलातर्फे गरजुंना किराणा सामानाची किट वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा पोलीस दलतार्फे शहरातील विविध भागात राहणारे मजूर, परप्रांतीय कारागिर यांना किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले.
संचारबंदी व लॉक डाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अनेकांना उपाशीपोटी राहावे लागत आहे. अशा मजुर कुटूंबांना पोलीस दलाने मदतीचा हात दिला आहे. आठ दिवस पुरेल इतका किराणा असलेली किट शुक्रवारी सायंकाळी वाटप करण्यात आली. करण चौफुलीवरील झोपडपट्टीत ही मदत देण्यात आली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले आदींसह शहर, उपनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक पंडित यांनी सांगितले, पोलीस दलाने मदतीचा हात देत गरजूंना थेट वस्तू स्वरूपात मदत वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सुरुवातीला अधिकारी, कर्मचारी यांनी यात सहयोग दिला आहे. त्यानंतर विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांच्या मदतीने ही मदत वाटप करण्यात येणार आहे. पोलीस दलातील जेव्हढ्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्षिसे भेटली आहेत. त्यांनी त्या बक्षिसाची रक्कम या मदतनिधीत टाकली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमासाठी विविध सेवाभावी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Web Title: Police force distributes groceries kit to needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.