शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलाने जप्त केलेला मद्यसाठा हॅाटेलमध्ये विक्रीला- दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

याबाबत वृत्त असे की, नंदुरबारातील एका हॅाटेलवर काही दिवसांपूर्वी उपनगर पोलिसांनी छापा टाकून अवैध मद्यसाठा जप्त केला होता. तोच ...

याबाबत वृत्त असे की, नंदुरबारातील एका हॅाटेलवर काही दिवसांपूर्वी उपनगर पोलिसांनी छापा टाकून अवैध मद्यसाठा जप्त केला होता. तोच मद्यसाठा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने दुसऱ्या एका हॅाटेलमध्ये धाड टाकली असता निदर्शनास आले. जप्त केलेल्या साठ्यावर अर्थात प्रत्येक बाटलीवर विशिष्ट खूण केलेली असते. काही दिवसांनी तो साठा नष्ट करावा लागतो. मात्र, असे न करता तो दुसऱ्या हॅाटेलला विक्री झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे हा मद्यसाठा संबंधित हॅाटेलला कुणी पुरविला याबाबत चौकशी सुरू असून उपनगर पोलीस ठाण्यातील एक वरिष्ठ अधिकारी व एका कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याप्रकरणाची पोलीस दलात मोठी चर्चा आहे.

या प्रकरणी स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू केली आहे. तीन दिवसात त्यांना अहवाल देण्याचा सुचना केल्या आहेत. ही चौकशी निष्पक्ष व पारदर्शी व्हावी यासाठी संबधितांची तात्पुरती मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई होईल.

-महेंद्र पंडित, जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार.