सक्षम वैद्यकीय सेवा नसल्याने नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:39 PM2019-11-22T12:39:04+5:302019-11-22T12:39:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील शासकीय रुग्णालयात सक्षम वैद्यकीय सेवा नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...

The plight of citizens due to lack of competent medical care | सक्षम वैद्यकीय सेवा नसल्याने नागरिकांचे हाल

सक्षम वैद्यकीय सेवा नसल्याने नागरिकांचे हाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील शासकीय रुग्णालयात सक्षम वैद्यकीय सेवा नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे केवळ वैद्यकीय उपचार नव्हे तर अपघात, दुर्घटनेत व नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या पार्थिवावर शवविच्छेदनासाठी तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागत आहे. शहरासह तालुक्यात अद्ययावत आरोग्य सेवा शासनाने उपलब्ध   करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शहादा तालुका सर्वच दृष्टीने आघाडीवर असल्याचे सर्वश्रुत आहे. शहराचा औद्योगिक, शैक्षणिक व  अन्य विकास मोठय़ा प्रमाणात झाला असून नोकरी, शिक्षण, व्यवसाय आदीनिमित्त शहाद्याशी अन्य भागातील जनतेचा दैनंदिन संपर्क वाढलेला आहे. येथून राज्य महामार्गही जात असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. ग्रामीण भागातूनही कामानिमित्त ये-जा करणा:यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. शहादा व परिसरात वाहनांची संख्याही अधिक प्रमाणात आहे. रस्ते अपघात व नैसर्गिक आपत्तीत सापडून दुर्दैवी घटना घडल्यानंतर मृतदेहाच्या  शवविच्छेदनासाठी सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह न्यावा लागतो. वास्तविक शहादा येथे नगरपालिकेचे रुग्णालय आहे. मात्र या ठिकाणी शवविच्छेदनाची जबाबदारी पार पाडू शकणा:या वैद्यकीय अधिका:यांची कमतरता आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या शहादा येथे वर्ग एक वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. 
आजही शहाद्यात सक्षम वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने दुर्दैवी आकस्मिक मृत्यू, अपघाती घटना घडल्यानंतर मृतदेह शवविच्छेदासाठी सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील म्हसावद येथे नेला जाणे अनिवार्य ठरते. यात मृतदेहाच्या हेळसांडसोबत नातेवाईकांना मोठय़ा प्रमाणात मनस्ताप सोसावा लागतो. शहादा पोलीस  ठाणेअंतर्गत शहादा शहरासह 96 गावांचा समावेश आहे. सुमारे दोन लाख लोकसंख्या यात समाविष्ट आहे. दररोज परिसरात किरकोळ घटना घडत असतात. यात प्रामुख्याने अपघात, नैसर्गिक आपत्तीद्वारे मृत्यू होणे, हाणामा:या यांचा समावेश आहे. या घटनातील मयतांसह जखमींना तसेच संशयीत आरोपींना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पोलिसांना शहादा ते म्हसावद असा प्रवास प्रत्येक घटना घडल्यानंतर करावा लागतो. ज्या पध्दतीने यात मयतांच्या नातेवाईकांची हालअपेष्टा होते त्याच पद्धदतीने जखमींच्या नातेवाईकांसह वैद्यकीय चाचणीसाठी घेवून जाणा:या पोलिसांनाही अनेक कष्ट सोसावे लागतात.
शहादा तालुक्यात गेल्या काही महिन्यात दोन मोठय़ा दुर्घटना घडल्या. यात वडछील, ता.शहादा येथे गणपती विसर्जनादरम्यान सहा तरुणांना आपला प्राण गमवावा लागला तर शहाणा, ता.शहादा येथे वीज झोपडीवर पडल्याने एक जण मयत तर पाच जण जखमी झाले होते. या दोन्ही घटनांमधील मयतांच्या पार्थिवांचे शवविच्छेदन करण्यासाठी नातेवाईकांसह पोलीस प्रशासनाला शहादा शहर जवळ असतानाही         केवळ येथील रुग्णालयात शवविच्छेदन होत नसल्याने म्हसावद येथे जावे लागले. तसेच जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सुमारे 40 किलोमीटर अंतर एवढा प्रवास करावा लागला. अशाच अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. हे सर्व थांबण्यासाठी नागरिकांना किमान आरोग्याच्या सेवा उपलब्ध होण्यासह मयतांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन वेळेत होणे अपेक्षीत असल्याने येथील शासकीय रुग्णालयात सक्षम तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी असणे काळाची गरज   आहे .

शहादा येथील सरकारी दवाखान्यात कायमस्वरुपी वर्ग-1 वैद्यकीय अधिका:याची नियुक्ती होण्याबाबत  माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्यामार्फत लोकप्रतिनिधी संवाद मंचने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधितांकडून वेळोवेळी आश्वासनच मिळाले आहे. शहादेकरांची या सुलतानी जाचातून सुटका करण्यासाठी शहादा येथे वर्ग-1  दर्जाच्या वैद्यकीय अधिका:यांची कायमस्वरुपी नियुक्ती करण्यासाठी जिल्हाधिका:यांनी संबंधितांना आदेशित करावे, अश अपेक्षा नागरिक लोकप्रतिनिधी संवाद मंचच्या पदाधिका:यांसह जनतेतून व्यक्त होत आहे.
 

Web Title: The plight of citizens due to lack of competent medical care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.