जिल्ह्यात लवकरच प्लाझ्मा युनिट कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST2021-05-03T04:24:58+5:302021-05-03T04:24:58+5:30

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाला प्राप्त प्लाझ्मा युनिट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी दिली. ...

The plasma unit will be operational soon in the district | जिल्ह्यात लवकरच प्लाझ्मा युनिट कार्यान्वित होणार

जिल्ह्यात लवकरच प्लाझ्मा युनिट कार्यान्वित होणार

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाला प्राप्त प्लाझ्मा युनिट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी दिली. याबाबत ‘रक्त फाऊंडेशन एक वटवृक्ष’ या सेवाभावी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले.

सध्या कोरोना रुग्णांना प्लाझ्मा मोठ्या प्रमाणावर लागत आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तातून प्लाझ्मा वेगळे करण्याची सोय नाही. गेल्यावर्षी यासाठी प्लाझ्मा युनिट मिळाले होते; परंतु शासनाच्या परवानगीअभावी ते कार्यान्वित होऊ शकले नव्हते. अद्यापही त्याबाबत कुणी फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे प्लाझ्मादात्यांना धुळे किंवा जळगाव येथे जावे लागते. तेथे प्लाझ्मा देऊन ते रुग्णांना येथे आणावे लागते. यासाठी वेळ व पैसाही खर्च होतो. त्यामुळे प्लाझ्मा युनिट सुरू करावे, अशी मागणी ‘रक्त फाऊंडेशन एक वटवृक्ष’ या सेवाभावी संस्थेने केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांना निवेदनही दिले आहे. त्यांनी लवकरच याबाबत आवश्यक ती परवानगी घेऊन युनिट कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे स्थानिक ठिकाणीच रुग्णांची मोठी सोय होणार आहे. यावेळी फाऊंडेशनचे गौतम बैसाणे, भूषण पाटील, आकिब धोबीशेख, मोहन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: The plasma unit will be operational soon in the district