निंभोरे येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:48+5:302021-06-21T04:20:48+5:30

निंभोरे येथील सप्तशृंगी माता मंदिर परिसर, संत दगा महाराज मंदिर परिसर, नुकतेच तयार झालेले अमरधाम परिसर तसेच गावात विविध ...

Plantation at Nimbhore | निंभोरे येथे वृक्षारोपण

निंभोरे येथे वृक्षारोपण

निंभोरे येथील सप्तशृंगी माता मंदिर परिसर, संत दगा महाराज मंदिर परिसर, नुकतेच तयार झालेले अमरधाम परिसर तसेच गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वनक्षेत्रपाल एम.बी. चव्हाण यांनी वृक्ष लागवडीविषयी मार्गदर्शन केले. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी यांनी सप्तशृंगी माता मंदिर व संत दगा महाराज मंदिर येथील सेवेकऱ्यांना सतरंजी भेट दिली. कार्यक्रमास युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी, सरपंच ताईबाई रामचंद्र ठाकरे, वनरक्षक रत्ना निकुंभे, वनपाल पी.आर. जगताप, आर.एच. चौधरी, एस.आर. दीक्षित, सुरेश गिरासे, माजी सरपंच रामचंद्र ठाकरे, प्रभू महाराज, रतिलाल राठोड, सजन मोरे, झुलाल मालचे, देवन ठाकरे, सुभाष गिरासे, राकेश भदाणे व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मनमत बर्डे यांनी तर आभार ईश्वर माळी यांनी मानले.

Web Title: Plantation at Nimbhore