शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अरिहंत शिक्षण संस्थेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST

क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठान, नंदुरबार नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठान नंदुरबारतर्फे शिवजयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी ...

क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठान, नंदुरबार

नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठान नंदुरबारतर्फे शिवजयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, नीलेश जगताप, भाजप सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, संदीप चौधरी, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अश्विन सोनार, प्रवीण मराठे, मनीष चौधरी, देवा कासार, विशाल मराठे आदी उपस्थित होते.

छायाचित्र प्रदर्शन

शहादा येथील शिवछत्रपती ग्रुपच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या रेखाटलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घोगरे, श्याम जाधव, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, शिवाजीराव पाटील, डॉ. किशोर पाटील आदी उपस्थित होते.

वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, शहादा

शहादा येथील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शांताराम बडगुजर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्याना शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र व पराक्रमाचा परिचय करून देतांना सांगितले की, शिवबा यांनी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्रातील शेतकरी व सर्व सामान्य जनतेला न्याय व हक्काचे स्वराज्य स्थापन करून दिले, आता ह्या स्वराज्याला सुराज्य बनवण्याचे महान कार्य विद्यार्थ्यांच्या हाती आहे, असे सांगत कार्यक्रमाची सांगता केली. याप्रसंगी प्राचार्य शांताराम बडगुजर, आयएमआरडीचे डायरेक्टर अनिल पाटील, एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.सोनाली पाटील, प्रा.इरफान पठाण, तसेच महाविद्यालयाचे प्रा. अनिल जगदाळे, प्रा.संदीप मराठे, प्रा.सचिन पाटील, प्रा.योगेश पाटील, प्रा.दीपक वळवी, प्रा.युगंधरा पाटील, प्रा.हर्षा भावसार, प्रा.सुवर्णा पाटील, प्रा.राजश्री वळवी व कर्मचारी सी.डी. भोपे, प्रफुल पाटील, प्रा.हरीश साळुंके, शिपाई राहुल पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील, भरत धनगर व विद्यार्थी उपस्थित होते.

प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिर, नंदुरबार

नंदुरबार येथील प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राहुल मोरे होते. प्रारंभी वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी शिक्षिका संगीता लोहार, मुख्याध्यापक राहुल मोरे यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर वेशभूषा केलेले विद्यार्थ्यांसह शहरातील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. शाळेने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात पोवाडे म्हणणे, किल्ले तयार करणे, जिजाऊ व शिवराय यांची वेशभूषा करणे, शिवाजी महाराजांविषयी निबंध लेखन इत्यादी विषय देण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन शशिकांत निकम तर आभार सुनील वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.