शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

काम पुर्ण होण्याआधीच रस्त्यात खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटा रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण होण्याआधीच  उखडण्यास सुरुवात झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटा रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण होण्याआधीच  उखडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.   धरणगाव ते धानोरा या राज्य मार्गाच्या नंदुरबार शहरातील वाघेश्वरी चौफुली ते भोणेफाटा र्पयतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. काम सुरू झाल्यापासूनच ठेकेदाराने मनमानी सुरू केली आहे. सुरुवातीचे दोन महिने नागरिकांना गुडघ्याएवढय़ा चिखलातून वाहने काढावी लागली. आता एका बाजुचा रस्ता पुर्ण करून तो वापरास सुरु करण्यात आला आहे. परंतु या  रस्त्याचे काम पुर्ण होण्याआधीच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. एका ठिकाणी तर खड्डा पडून त्यातून लोखंडी सळई बाहेर येवू लागल्या आहेत. काम पुर्ण होण्याआधीच ही स्थिती असेल तर पुढील काळात या रस्त्याची अवस्था काय होईल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या रस्त्याला जोडणा:या दोन्ही बाजुच्या वसाहतींमध्ये जाणा:या रस्त्यांची अवस्था देखील खराब झाली आहे. गोपाळनगर वसाहतीत जाण्यासाठी नागरिकांना चिखल आणि खड्डयांमधून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या कामावर देखरेख करणे आणि गुणवत्तेची तपासणी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असतांना दुर्लक्ष आहे. यामुळे ठेकेदाराचे फावले आहे.