पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:08 IST2020-05-03T13:08:16+5:302020-05-03T13:08:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवे तोरणमाळ म्हणून ओळखले जाणाऱ्या बुरूमपाडा येथील तीन हातपंप व एक विहिर आटल्याने ग्रामस्थांना ...

Pipes have to be made for water | पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवे तोरणमाळ म्हणून ओळखले जाणाऱ्या बुरूमपाडा येथील तीन हातपंप व एक विहिर आटल्याने ग्रामस्थांना दºयाखोºयात पायपीट करीत दोन किलोमिटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. सध्या प्रशासन कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये गुंतले असल्याने पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.
बुरुमपाडा अंतर्गत दोन पाडे आहेत. या तिन्ही ठिकाणी सध्या पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. यंदा परिसरात समाधानकारक पाऊस पडला असला तरी पाणी अडविण्याची व जिरवण्याची सोय नसल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन तोरणमाळ म्हणून ओळख निर्माण झालेल्या बुरूमपाडा येथील पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या भागाची लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास आहे.
एका पाड्यात एक कुपनलिका आहे. त्यात बºयापैकी पाणी आहे. दुसºया पाड्यात तीन कुपनलिका व एक विहिर आहे. या सर्वांचे पाणी आटले आहे. पिण्याचे पाणी दोन किलोमिटर अंतरावरून आणावे लागत आहे. तर सात किलोमिटर अंतरावर असलेल्या तोरणमाळ तलावात गुरांना पाण्यासाठी न्यावे लागत आहे. पावसाळा सुरू होण्यास सव्वा महिन्याचा कालावधी आहे. या काळात या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी तातडीने टँकर सुरू करून या भागातील पाणी टंचाईची समस्या सोडवावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Pipes have to be made for water