पिंपळनेरच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील 5 जणांविरूद्ध गुन्हा

By Admin | Updated: April 20, 2017 16:23 IST2017-04-20T16:23:56+5:302017-04-20T16:23:56+5:30

गोपाळनगरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpalner gangrape case against five persons in a family | पिंपळनेरच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील 5 जणांविरूद्ध गुन्हा

पिंपळनेरच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील 5 जणांविरूद्ध गुन्हा

 पिंपळनेर,जि.धुळे, दि.20- येथील गोपाळनगरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी संशयितांच्या माता-पित्यास अटक करून त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.  

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची ही घटना 8 एप्रिल रोजी सकाळी गोपाळनगर येथे घडली. मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र ती न सापडल्याने येथील पोलीस ठाण्यात ती हरविल्याची तक्रार करण्यात आली. मुलीच्या वडिलांनी  शेजारी असलेल्या कुटुंबाविरूद्ध संशय व्यक्त करून तशी फिर्याद दिली. त्यानुसार अरुण पवार (वय 43), सुनंदा अरुण पवार (39), राहूल पवार (21), विक्की पवार यांच्यासह पाचजणांविरूद्ध भादंवि कलम 363, 366 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. 
 

Web Title: Pimpalner gangrape case against five persons in a family