शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

साने गुरुजी विद्याश्रममध्ये छायाचित्र प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या विद्याश्रम परिवारातील विद्यार्थ्यांसाठी ‘आर्टिफेस्ट २०२०’ अंतर्गत छायाचित्र स्पर्धेतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या विद्याश्रम परिवारातील विद्यार्थ्यांसाठी ‘आर्टिफेस्ट २०२०’ अंतर्गत छायाचित्र स्पर्धेतील छायाचित्रांचे प्रदर्शन येथे भरविण्यात आले.अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून राष्टÑीय किर्तीच छायाचित्रकार अशोक पाटील (पुणे), माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, राजेंद्र जव्हेरी, किशन चौधरी, मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्यासह विविध ज्ञानशाखांचे प्राचार्य उपस्थित होते.अशोक पाटील म्हणाले की, छायाचित्रण व चित्रकलेसाठी सातपुड्याच्या पायथ्याशी मोठी संधी आहे. नाविन्यता व सृजनशिलता येथील नव्या पिढीत मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कलेला संधी प्राप्त होऊ शकते. खान्देशात विशेषत: सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पुरातन वास्तूंचे जतन होणे आवश्यक आहे. अनेक शब्द बोलण्यापेक्षा एक चित्र मोठे काम करत असून चित्रकला व छायाचित्रणास याठिकाणी कलादालन उभारून संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. दीपक पाटील म्हणाले की, छायाचित्र व चित्रकलेकडे पाहण्यासाठी योग्य दृष्टी आणि दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. यशस्वी चित्रकार होण्यासाठी कठोर परिश्रम घेणे युवा चित्रकारांना प्रेरणादायी ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा.दिलीप सूर्यवंशी यांनी केले.

छायाचित्र स्पर्धेचे परीक्षण शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार अशोक वडनेरे व संजय पाटील यांनी केले. छायाचित्रण स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा या वेळी सन्मान करण्यात आला. त्यात प्रथम सुरभी प्रदीप पाटील (सातपुडा विद्यालय), द्वितीय हर्षल पवार (औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय), तृतीय दर्शन भालेराव (कृषी महाविद्यालय) व उत्तेजनार्थ नीलेश सोनवणे (अभियांत्रिकी महाविद्यालय) यांचा गौरव करण्यात आला.