शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आणि चिखलात सडू लागली मिरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :    तीन दिवसाच्या पावसामुळे जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :    तीन दिवसाच्या पावसामुळे जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर परिसरात पसरलेल्या मिरची पथारींवर पाणी व चिखल झाला आहे. त्यामुळे मिरची सडण्याची भिती आहे. यामुळे यंदा मिरची प्रक्रिया उद्योगावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. नुकसानीची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून ढगाळ वातावरण व पाऊस सुरू आहे. रविवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे मात्र शेती आणि व्यापारऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. शहरात सर्वत्र पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची देखील वाट लागली आहे. नंदुरबारातील होळ शिवार आणि चौपाळे शिवारातील मिरची पथारींवर तर चिखल आणि पाणी साचले आहे. त्यामुळे पथारींवरील शेकडो क्विंटल मिरची खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीच क्षेत्र कमी यंदा आधीच मिरचीचे क्षेत्र कमी झाले आहे. शिवाय अतिवृष्टी आणि वारंवार वातावरणातील बदलामुळे मिरचीवर विविध पिपकांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरची उत्पादन यंदा कमी होत आहे. त्यातच अवकाळी पावसाने फटका दिला आहे. यंदा मिरचीला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. परंतु ती देखील फोल ठरली आहे. आता तर पावसामुळे मिरची डागी होण्याचे प्रमाण आणि त्यावर विविध रोगाचे प्रमाण देखील वाढणार असल्यामुळे पुन्हा भाव घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरचीचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. 

व्यापाऱ्यांचेही नुकसानपावसामुळे मिरची खरेदीदार व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पथारींवरील शेकडो क्विंटल मिरची सडण्याच्या मार्गावर आहे. शहरात होळ शिवारात अर्थात उड्डाणपुल परिसर आणि धुळे रस्त्यावरील चौपाळे शिवार परिसरात मिरची पथारी आहेत. शेकडो एकर क्षेत्रावर असलेल्या या पथारींवर मिरची स्वच्छ करणे, खुडणे आणि वाळविण्याचे काम केले जाते. सुकलेली मिरची भरून गोडावूनमध्ये नेणे अशी कामे या ठिकाणी केली जातात. सततच्या पावसामुळे पथारींवर पाणी साचले आहे. काळी मातीच्या परिसर असल्यामुळे चिखलाचे देखील साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  त्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करावे व मदतीसाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागीण देखील व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.  दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे मिरची खरेदी अर्थात लिलाव होणार नसल्याचे बाजार समितीने आधीच कळविले आहे. त्यामुळे शेतकरऱ्यांनी मिरची विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक शेतकरऱ्यांची मिरची शेतातच खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा देखील पंचनामा करण्याची मागणी आहे.