शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातात विद्याथ्र्यासह प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : समोरुन येणा:या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस साईडपट्टी खाली उतरल्याने अपघात झाल्याची घटना प्रतापपूरपासून एक ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर : समोरुन येणा:या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस साईडपट्टी खाली उतरल्याने अपघात झाल्याची घटना प्रतापपूरपासून एक किलोमीटर अंतरावर शुक्रवारी घडली. या अपघातात 20 ते 25 प्रवासी  किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून त्यामुळेच अपघात झाल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.तळोदा बसस्थानकातून तीन वाजता सुटणारी तळोदा-खर्डी ही बस (क्रमांक एम.एच.20 डी- 9500) प्रतापपूरपासून एक किलोमीटर अंतरावर राणीपूर रस्त्याने खर्डीकडे जात होती. त्याचवेळी समोरुन येणा:या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचे चालक एन.पी. कोळी यांनी बस साईडपट्टीच्या खाली उतरवली. मात्र चिखल असल्याने बस खड्डय़ात जाऊन आदळली. या अपघातात  खर्डी येथील सूरसिंग गेंद्या पाडवी,  रामा नाना पाडवी, जयतूबाई रामा पाडवी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर प्रतापपूर येथील प्राथमिक              आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अपघातानंतर प्रतापपूर ग्रामस्थांनी ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने बस खड्डय़ातून काढण्यास मदत केली. ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल चालक एन.पी. कोळी व वाहक बी.डी. ठाकरे यांनी आभार मानले. तळोदा तालुक्यातील प्रतापपूर ते खर्डी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या साईडपट्टय़ा नामशेष झाल्या असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात या रस्त्याव वारंवार           अपघात होत असून काही जण जायबंदी झाले आहेत. या रस्त्यावर दोन मोठी वाहने आली तर ती काढण्यासाठी चालकांना कसरत करावी लागते. शुक्रवारी झालेला बसचा अपघातही रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया राणीपूर, खर्डी, बंधारा, धनपूर, सावरपाडा, प्रतापपूर येथील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. या रस्त्याचे काम तातडीने सुरू न         केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही वरील गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.