जिल्हाभरातील ७७ उपकरणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:50 PM2020-02-15T12:50:57+5:302020-02-15T12:51:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : विज्ञान, तंत्रज्ञानाला गवसणी घालत जिल्हाभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक उपकरण तयार करून ते जिल्हा विज्ञान ...

Participation of 5 devices across the district | जिल्हाभरातील ७७ उपकरणांचा सहभाग

जिल्हाभरातील ७७ उपकरणांचा सहभाग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : विज्ञान, तंत्रज्ञानाला गवसणी घालत जिल्हाभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक उपकरण तयार करून ते जिल्हा विज्ञान प्रदर्शनात मांडले आहे. ७७ उपकरणे सहभागी असून जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा वळवी यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले.
प्रकाशा ता. शहादा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जि.प.अध्यक्षा सिमा वळवी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सभापती अभिजीत पाटील, जयश्री दीपक पाटील, शिक्षणाधिकारी मच्छिन्द्रनाथ कदम, भानुदास रोकडे, गटशिक्षणाधिकारी ए.डी. पाटील, उषा पेंढारकर, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, विषयतज्ञ चंद्रकांत पाटील, प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे, संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पटेल, संचालक हरी दत्तू पाटील आदी उपस्थित होते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर समाजाचा आणि राष्ट्राचा प्रगतीसाठी करा असे विद्यार्थ्यांना आवाहन करीत सिमा वळवी यांनी जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी दरवर्षी शेस फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले.
अभिजीत पाटील यांनी तालुका व जिल्हा विज्ञान प्रदर्शन साठी निधीची मागणी आमच्याकडे मुख्याध्यापक संघटनेने केली होती. त्यानुसार आता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रदर्शनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शाळेच्या व समाजाच्या विकास करा असे त्यांनी सांगितले.
मुकेश पाटील यांनी विज्ञान आणि मानव यांचा जवळचा संबंध आहे. जिल्ह्यातील इतर शाळांनी ही विज्ञान प्रदर्शन भरविण्यासाठी मागणी करावी असे त्यांनी आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी विविध उदाहरणे देत विज्ञानवादी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अमेरिका व युरोप हे देश प्रगती करीत आहे कारण त्यांचा कल जास्तीत जास्त विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याकडे आहे. तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाज आणि राष्ट्राच्या हितासाठी विद्यार्थ्यांनी करावा आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे असे त्यांनी आपल्या मनोगतातून केले. शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी प्रास्ताविकात जिल्ह्याने बारावेळा राष्ट्रीय स्तरावर विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊन पारितोषिक मिळवले आहे. तसेच नऊवेळा इंस्पायर अवार्डमध्ये देखील राष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे. तेव्हा गुणवत्ता सोबतच नंदुरबार जिल्हा विज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती करत असून अशा या विज्ञान प्रदर्शनातून एक चांगले शास्त्रज्ञ तयार होतील असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला रिमोटद्वारे दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर इंस्पायर अवार्ड प्राप्त नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षक यांच्या सन्मान करण्यात असला त्यात श्रॉफ हायस्कूलची विद्यार्थिनी आर्या पाटील, शिक्षिक चेतना पाटील, एकलव्य विद्यालयाची अक्षरा आगीवाल, शिक्षक मिलिंद वडनेरे, भाग्यचिंतन विद्यालयाची मोगरा पाडवी, शिक्षक भिका भोई या विद्यार्थी शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे तर आभार शाळेचे प्राचार्य आय.डी .पटेल यांनी मानले.

Web Title: Participation of 5 devices across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.