घरात बसून राहण्यामुळे मुलांमधील लठ्ठपणाची चिंता सतावतेय पालकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:42+5:302021-03-27T04:31:42+5:30

नंदुरबार : सततचे लॅाकडाऊन, कोरोनाची भीती यामुळे मुलांना पालक घराबाहेर पडू देत नाहीत. शिवाय सततच्या ॲानलाईन क्लासेसमुळे मुलं मैदानी ...

Parents are worried about obesity in their children due to sitting at home | घरात बसून राहण्यामुळे मुलांमधील लठ्ठपणाची चिंता सतावतेय पालकांना

घरात बसून राहण्यामुळे मुलांमधील लठ्ठपणाची चिंता सतावतेय पालकांना

नंदुरबार : सततचे लॅाकडाऊन, कोरोनाची भीती यामुळे मुलांना पालक घराबाहेर पडू देत नाहीत. शिवाय सततच्या ॲानलाईन क्लासेसमुळे मुलं मैदानी खेळही विसरली आहेत. यामुळे मुलांचे वजन वाढण्याचे प्रमाण गेल्या वर्षभरात वाढले आहे. स्थूलतेमुळे मुलांना इतर आजारांचीही भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोना तसेच सततच्या लॅाकडाऊनमुळे मुुलांना बाहेर निघणे जिकरीचे झाले आहे. यामुळे घरात बसून मुलांमध्ये स्थूलता वाढू लागली आहे. अनेक मुलांबाबत हा फरक प्रकर्षाने जाणवू लागला आहे. यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. शाळा सुरू राहिल्या म्हणजे क्लास, शाळा, शाळेतील मस्ती, खेळ, घरी आल्यावर सवंगड्यांसोबत खेळणे यात मुलांची शारीरिक हालचाल चांगल्या प्रकारे होत असते. परंतु गेल्या वर्षभरात हे सर्व थांबल्याने स्थूलतेचा प्रश्न उभा ठाकला आहे.

मुलांनी हे करावे...

घरात असलो तरी अंगणात किंवा कॅालनीच्या मोकळ्या मैदानात विविध खेळ किमान तासभर खेळावे. घरात योगा, प्राणायाम करावा. फास्टफूड ऐवजी सकस आहारासाठी त्यांना आग्रह करावा. सायकलिंगसाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे. किमान १५ मिनिटे ते एक तास त्यांना पायी चालवावे. मुलांना सतत विविध कामात रमवावे. परिवारासोबत जेवण व गप्पा कराव्या.

मुलांनी हे टाळावे

स्थूलता वाढू नये यासाठी मुलांनी फास्टफूड खाणे टाळावे. सतत मोबाईलचा वापर करू नये. बैठे खेळ जास्त खेळू नये. रात्री उशिरा झोपून सकाळी उशिरा उठू नये. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहू नये. भूक नसताना काही खाऊ नये. ॲानलाईन क्लास झाल्यानंतर लागलीच टीव्हीसमोर बसू नये. बाहेर निघताना मास्कचा वापर आवश्यक करावा.

n मुलांचे १३ वर्ष वयापर्यंतचे वजन वर्षाला सरासरी तीन किलो वाढणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक वजन वाढल्यास मधुमेहासारखे आजार त्यांंना लहानपणीच लागू शकतात. त्यासाठी त्यांचे वय, उंची व वजन या नुसार पालकांनी त्यांच्याकडून शारीरिक हालचाली, कसरती करून घेत त्यांना खेळासाठी प्रोत्साहन द्यावे.

Web Title: Parents are worried about obesity in their children due to sitting at home