शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानामुळे पपई संकटात

By admin | Updated: March 29, 2017 23:43 IST

भावही घसरला : उत्पादक शेतकºयांकडून विविध उपाययोजना

ब्राह्मणपुरी : दिवसेंदिवस पडत असलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे पपई पीक संकटात सापडले आहे.  आधीच घसरलेल्या दरामुळे यापुढे पपईची लागवड करावी की नाही, अशा प्रश्न पपई उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात पपईची लागवड करण्यात येते. दहा महिन्यांच्या या पिकाला दर चार ते पाच दिवसात पाणी देण्याची आवश्यकता असते. ब्राह्मणपुरी परिसरातील पपई पंजाब, दिल्ली, हरियानासह विविध राज्यात रवाना होते. मात्र यंदा पपई पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात पपईवर व्हायरल येत असल्याने ती खराब  होत आहे. याशिवाय सध्या गेल्या आठवड्यापासून तापमानाने चाळिशी गाठली आहे. बदलत्या वातावरणामुळे पिके धोक्यात आलेली आहे. उन्हामुळे झाडावरील छत्र्या गळत असल्याने पपई फळ निकामी होत आहे. काही शेतकºयांनी गोणपाट, पांढरे कापड लावून पपईला जगविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातूनही पपईचे पूर्णपणे संरक्षण होत नसल्याचे समोर येत आहे.
आजच्या स्थितीत पपई पिकाला पाच ते साडेपाच रुपये प्रती किलोने भाव मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. अशा मन:स्थितीमुळे अनेक शेतकरी थेट पपई पिकावर रोटाव्हेटर फिरवून पपईचे क्षेत्र खाली करीत असल्याचे दिसून येत आहे.     (वार्ताहर)

बदलत्या वातावरणाने पपई पीक खराब होत आहे. पपई पिकावर पांढरा व्हायरस येत असल्याने पपई खराब होत आहे. उन्हामुळे पपईच्या झाडावरील छत्र्या गळत असल्याने पपई फळ खराब होत आहे. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे पपई व केळी पिकाच्या नुकसानीची अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संबंधितांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी अपेक्षा.
-विजय पाटील,
शेतकरी