शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची मशागत करतानाच बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रगतीशिल शेतकरी हेमराज भारती यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रगतीशिल शेतकरी हेमराज भारती यांच्या मालकीच्या शेतात बैलजोडीच्या सह्याने आदऱ्या पाडवी हे शेतीची मशागत करीत होते. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतजमीन ओली असल्याने मशागत करीत असतांना बैल विद्युत रोहित्राजवळ अचानक खेचल्या गेल्याने वीजेचा धक्का बसून त्यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे घटनास्थळी एकच गर्दी होऊन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, विद्युत वितरण कंपनीचे अभियंता विलास गुरव यांनी घटना स्थळी भेट देवून पाहणी केली असता संबंधित शेतकºयास नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनाही त्यांनी पावसाळ्याच्या दिवसात वीजेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. या वेळी रांझणी गावातील जीर्ण विद्युत ताराही लवकरच बदलणार असल्याचे सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील गोस्वामी यांनी शवविच्छेदन करुन पंचनामा करण्यात आला.

ऐन खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच जोडीतील एक बैल गेल्याने हळहळ व्यक्त होत असून, कोरोनामुळे आधीच रब्बीत फटका बसलेल्या शेतकरीला मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने संबंधित शेतकरीला तत्काळ मदत मिळावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.