शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नियमित झालेल्या २४ पैकी १८ ग्रामसेवकांना मिळाली अनामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

जिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवक म्हणून २०१४ मध्ये रुजू होणाऱ्या २४ जणांकडून प्रत्येकी १० हजार रुपयांची अनामत रक्कम तालुकास्तरावर गटविकास ...

जिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवक म्हणून २०१४ मध्ये रुजू होणाऱ्या २४ जणांकडून प्रत्येकी १० हजार रुपयांची अनामत रक्कम तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात आली होती. नोकरीला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर १८ जणांनी अनामत रकमेची मागणी केल्यानंतर त्यांना ती परतही करण्यात आली होती. परंतु, यातील सहा जणांनी उशिराने मागणी नोंदविल्याची माहिती देण्यात आली आहे. परिणामी तीन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची अनामत रकमेची मागणी ही जिल्हा परिषदेच्या सभेत ठेवली जावून त्याठिकाणी निर्णय घेतल्यानंतर पुढे कार्यवाही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या सभेत हा ठराव होईल.

ग्रामसेवकांची अनामत रक्कम ही त्या-त्या गटविकास अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही ग्रामसेवकाला अडविले जात नाही. ती रक्कम मागणी केल्यानंतर तातडीने दिली जाते.

शेखर राैंदळ,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.

जिल्हा परिषदेकडे वारंवार मागणी करूनही सहा जणांची अनामत रक्कम परत मिळत नाही. जिल्हा परिषदेचा ठराव झाल्याची माहिती दिली जाते. परंतु, पैसे मिळत नाहीत. संघटनेकडून पाठपुरावा सुरू आहे.

-रवींद्र वळवी,

जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना.

२०१४ मध्ये झाली होती भरती

जिल्ह्यात ५९५ ग्रामपंचायती आहेत. यासाठी एकूण ४७८ ग्रामसेवक सध्या कार्यरत आहेत. २०१४ मध्ये २४ ग्रामसेवकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली होती. या सर्वांना नियुक्त्या देण्यात आल्यानंतर तीन वर्षे कंत्राटी म्हणून काम करून घेण्यात आले. यानंतर हे सर्व नियमित झाले आहेत.

जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून ग्रामसेवक भरती झाल्यानंतर तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांकडे १० हजार रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार सर्वच २४ जणांनी तातडीने रक्कम जमा करून दिली होती. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर १८ जणांनी रक्कम परत देण्यासाठी अर्ज केले होते.