शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले १२४ हातपंप बसवण्याचे मिळाले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखड्यात मंजूर केलेल्या हातपंपांना अखेर मूहूर्त मिळाला आहे़ दुर्गम भागासह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखड्यात मंजूर केलेल्या हातपंपांना अखेर मूहूर्त मिळाला आहे़ दुर्गम भागासह सपाटीच्या गावांमध्ये मंजूर असलेल्या १२४ हातपंपांचे काम थेट पावसाळ्यात पूर्ण करण्याचे आदेश काढण्यात आले असून दोन महिन्याच्या अवधीत गावोगावी हातपंप सुरु होणार आहेत़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने विविध कामे रखडली होती़ यात टंचाई निवारण आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या हातपंपांचाही समावेश करण्यात आला होता़ गेल्या १५ दिवसात या कामांना वेग आला असून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १२४ हातपंप आणि विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करुन त्यांना कार्यरंभ आदेश दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर हातपंप आणि पाणी योजनांची मागणी करणाऱ्या गावांना पावसाळ्यात शुद्ध आणि पिण्यायोग्य पाणी मिळणार असून दोन महिन्याच्या आत हा उपक्रम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान अक्कलकुवा तालुक्यात डेब्रामाळ येथील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न गेल्या वर्ष भरापासून प्रलंबित होता़ साहित्य बसवूनही प्रशासन याठिकाणी पाण्याच्या मोटारी बसवत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते़ याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबधित विभागाने कामकाजाला गती दिली असून येत्या आठवड्यात या ठिकाणी मोटारी बसवून पाणी योजनेची ‘टेस्टींग’ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़कोरोनामुळे तालुकनिहाय रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे बांधकामे तसेच दुरुस्तीच्या कामांचे प्रस्तावही सध्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे़यंदाच्या टंचाई निवारण आराखड्यात आदिवासी उपयोजनांतर्गत ६५ तर इतर योजनेतून ५९ असे एकूण १२४ हातपंप मंजूर करण्यात आले होते़ यासाठी १ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली होती़४धडगाव तालुक्यात ३१, अक्कलकुवा २७, नंदुरबार २९, नवापूर ३०, शहादा ११ आणि तळोदा तालुक्यात १० हातपंप मंजूर करण्यात आले होते़ गतकाळात लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणीत हे हातपंप रखडले होते़ या हातपंपांना नुकताच कार्यरंभ आदेश जारी करण्यात आला असून नियुक्त ठेकेदाराकडून हे काम दोन महिन्याच्या अवधीत पूर्ण होईल़अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील पाणी योजनेचा प्रश्न गेल्या काही वर्षात गंभीर झाला आहे़ यासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा खर्चाची सोलर पाणी पुरवठा योजना मंजूर करुन साहित्य बसवण्यात आले होते़ परंतू योजनेची चाचणी रखडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता़ यावर मार्ग काढून प्रशासनाने आठ दिवसात चाचणी करुन योजना सुरु करण्याचे नियोजन केले आहे़४टंचाई आराखड्यत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मागणी करणाºया ग्रामपंचायतींना पाणी योजना देण्याचे सूचित केले गेले होते़ यानुसार जिल्ह्यातून २१ प्रस्ताव मंजूर झाले असून या प्रस्तावांवर कारवाई करुन नळपाणी योजना १९ गावांमध्ये तातडीने सुरु केली जाणार आहे़जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कामकाजाला गती दिली आहे़ दोन महिन्यात हातपंप पूर्ण होतील़ पावसाळ्यात कामांना वेग देण्यात यावा यासाठी वेळोवेळी संबधितांकडून आढावा घेत पाणीटंचाई दूर करण्यात येणार आहे़-पी़टी़बडगुजर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि़प़नंदुरबाऱ