शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

लोकदालतीत सव्वातीन कोटींच्या वसुलीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:25 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ६८४ प्रकरणाचा निपटारा हाेवून तीन कोटी ...

  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ६८४ प्रकरणाचा निपटारा हाेवून तीन कोटी २९ लाख २९ हजार ७६ रूपयांची वसुलीचे आदेश देण्यात आले. राष्ट्रीय लोकन्यायालयास  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश   प्रमोद एस. तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. टी. मलिये यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यासाठी मुख्यालयातील तदर्थ जिल्हा न्या ए. एस. भागवत, वरिष्ट स्तर  दिवाणी न्या.  एल.डी गायकवाड मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही .जी.चव्हाण, कनिष्ट.स्तर सह दिवाणी न्या.    एस. ए. विराणी,  व कनिष्ट स्तर दुसरे सह दिवाणी न्या. एन.बी.पाटील यांनी पॅनल प्रमुख म्हणुन काम पाहिले. त्यांना मदतीसाठी विधिज्ञ  ए.सी.खैरनार,  के.एच.सावळे, एस.ए.सोनार, एस.ए.सावंत,  डी.एस.पार्टील, ए.बी.कढरे, अमरसिंग राजपुत, गोविंद चव्हाण,  पी.ए.पाटील व  विधी महाविदयालयाचे प्राचार्य . एन.डी.चौधरी, यांनी पॅनल सदस्य म्हणुन काम केले. लोकन्यायालयात खालीलप्रमाणे प्रकरणे ठेवण्यात येऊन सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहे. संपूर्ण जिल्हयातील निकाली झालेल्या न्यायालयातील एकुण प्रलंबित प्रकरणांमध्ये निकाली १७ दिवाणी प्रकरणात एक लाख रूपये वसुली झाली बॅक वसुलीचे सहा प्रकरणात तीन लाख ८६ हजार ६४६ वसुली झाली मोटार अपघाताच्या ३८ प्रकरणात  एक कोटी ५८ लाख २४ हजार १७७ रुपये. धनादेश अनादरच्या २७ प्रकरणात ४८ लाख ७९ हजार १०९ रूपये, कैाटुबिक वाद प्रकरणे व   फौजदारी वादाची १० प्रकरणे अशी ९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात दोन कोटी ११ लाख ८९ हजार ९३२ रूपये वसुली करणयात आली.तर संपूर्ण जिल्हयातील निकाली झालेल्या एकुण दाखलपुर्व प्रकरणांत बॅक वसुलीची ८३ प्रकरणे निकाली काढून एक कोटी १३ लाख  आठ हजार ४६७ रूपयांची वसुली तर वीज थकबाकी वसुलीची १८ प्रकरणे निकाली काढून एक लाख ४६ हजार ३२० व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची ४८५ प्रकरणे निकाली काढत  दोन लाख ८४ हजार ३५७ रूपये अशी ५८६ प्रकरणे निकाली काढत एक कोटी १७ लाख ३९ हजार १४४ रूपयांची वसुली झाली.