रब्बीच्या तयारीसाठी न फुटलेली बोंडेच आणली घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:51 PM2020-01-29T12:51:56+5:302020-01-29T12:52:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील कापूस लांबणीवर पडत आहे. यात रब्बी हंगामाला उशिर होऊ ...

In order to prepare for the rabbi, he brought home an unopened bond | रब्बीच्या तयारीसाठी न फुटलेली बोंडेच आणली घरात

रब्बीच्या तयारीसाठी न फुटलेली बोंडेच आणली घरात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील कापूस लांबणीवर पडत आहे. यात रब्बी हंगामाला उशिर होऊ नये, यासाठी नंदुरबार तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडून न फुटलेली कापसाची बोंडेच तोडण्यात येत आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांकडून मे व जुलै या दोन महिन्यांमध्ये कापसाची लागवड करण्यात आली. अतिवृष्टी व अवकाळी पाऊस अशा संकटांचा सामना करीत शेतकºयांनी कापूस पिकाची काळजी घेतली. त्यात मे महिन्यात लागवड केलेला कापूस संकटातच काढण्यात आला. तर जुलै महिन्यात लागवड करणाºया काही शेतकºयांनी डसेंबरपर्यंत कापूस काढला. तर बहुतांश शेतातील कापसाची बोंडे सतत ढगाळ वातावरण व वातावरणातील बदलांमुळे जानेवारीच्या अखरेपर्यंत फुटली नसून खरीप हंगामच लांबत चालला आहे.
खरीपातील कापूस लांबणीवर पडत असल्याने रब्बी हंगामही लांबत काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगाम लांबू नये, संभाव्य समस्या उद्भवू नये, यासाठी लहान शहादेसह नंदुरबार तालुक्यातील बहुतांश शेतकºयांकडून खरीप हंगामातील कापसाची बोंडे फुटण्याची प्रतिक्षा न करता फुटण्यापूर्वीच बोंडे तोडली जात आहे. त्यातील कापूस मजूरांकडून काढण्यात येत असल्याचे लहान शहाद्याचे किरण पाटील यांनी सांगितले.

अतिवृष्टी व अवकाळी पाऊस अशा संकटांचा सामना करीत शेतकºयांनी कापूस पिकाची काळजी घेतली. त्यात मे महिन्यात लागवड केलेला कापूस संकटातच काढण्यात आला. तर जुलै महिन्यात लागवड करणाºया काही शेतकºयांनी डिसेंबरपर्यंत कापूस काढला.
नंदुरबार तालुक्यातील शेतकºयांना दुर्गम भागातील शेतमजूरांचा आधार घ्यावा लागत आहे.

Web Title: In order to prepare for the rabbi, he brought home an unopened bond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.