शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा नियंत्रण प्राधिकरण संचालकांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नर्मदा नियंत्रण प्राधिकरण संचालक डॉ.अफरोज अहमद यांच्या अध्यक्षतेखाली पुर्नवसन गावठाण व सरदार सरोवर प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नर्मदा नियंत्रण प्राधिकरण संचालक डॉ.अफरोज अहमद यांच्या अध्यक्षतेखाली पुर्नवसन गावठाण व सरदार सरोवर प्रकल्प संबंधित आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. दरम्यान, नर्मदा बचाव आंदोलनातर्फे सर्कीट हाऊसवर अहमद यांना घेराव घालण्यात आला.बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सरदार सरोवर प्रकल्पाचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत डॉ.अहमद यांनी सरदार सरोवर प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन, भूसंपादन, महाराष्ट्रातील बुडीत क्षेत्राची सद्यस्थिती, सरदार सरोवर प्रकल्प बांधिताना वाटप करण्यात येणाऱ्या जमीनी, सिंचन सुविधा, भुखंड वाटप, सानुग्रह अनुदान, याबाबत आढावा घेतला. त्यांनी सांगितले, गुजरात राज्यात पुनर्वसन स्विकारलेल्या महाराष्ट्रातील प्रकल्पबाधितांच्या जमीन व सिंचन इत्यादी संदर्भात ११५ प्रकल्प बाधीतांच्या तक्रारी प्राप्त आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. पुनर्वसनामुळे एकत्रित वस्ती झाल्याने पुनर्वसन गावठाणातील शेती आधुनिक पध्दतीने केली जाऊ लागली आहे. जमीन वाटप, शैक्षणिक व आरोग्य सुविधा इत्यादी मुळे प्रकल्पबाधितांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सक्रीट हाऊसवर दुपारी अचानक धडक दिली. या ठिकाणी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे संचालक डॉ.अफरोज अहमद थांबले होते. तेथे बैठकही घेणार होते. परंतु आंदोलनाचे कार्यकर्ते लतिका राजपूत, चेतन साळवे व इतरांनी धडक देत गो बॅकचा नारा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून ते या पदावर आहेत. परंतु त्यांच्याकडून न्याय मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणने होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.