तळोद्यातील उघडय़ा घरातून मोबाईलसह रक्कम लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:38 IST2019-10-04T12:38:35+5:302019-10-04T12:38:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा शहरातील मिरा कॉलनी भागात भर दुपारी उघडय़ा घरातून मोबाईलसह रोख रक्कम लांबवल्याचा प्रकार ...

From the open house in the basement with the mobile | तळोद्यातील उघडय़ा घरातून मोबाईलसह रक्कम लांबवली

तळोद्यातील उघडय़ा घरातून मोबाईलसह रक्कम लांबवली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा शहरातील मिरा कॉलनी भागात भर दुपारी उघडय़ा घरातून मोबाईलसह रोख रक्कम लांबवल्याचा प्रकार घडला़ बुधवारी दुपारी दीड ते साडेचार दरम्यान ही घटना घडली़ 
उमाकांत सुरेश पवार हे पिठाच्या गिरणीचा व्यवसाय करतात़ बुधवारी दुपारी अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या घरात प्रवेश करत घरातील 13 हजार 500 रुपयांचा मोबाईल आणि 14 हजार 500 रुपये रोख असे चोरुन नेल़े काही वेळाने त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी परिसरात चोरटय़ांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ 
याबाबत उमाकांत पवार यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वसावे करत आहेत़ 
 

Web Title: From the open house in the basement with the mobile