शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा ते गव्हाळीपर्यंतच्या रस्त्यावर केवळ खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोदलपाडा : नेत्रंग ते शेवाळी महामार्गावरील जीवघेणे खड्डे अपघातस निमंत्रण देऊ पाहात आहेत. या महामार्गावरील तळोदा ...

लोकमत न्यूज नेटवर्क
मोदलपाडा : नेत्रंग ते शेवाळी महामार्गावरील जीवघेणे खड्डे अपघातस निमंत्रण देऊ पाहात आहेत. या महामार्गावरील तळोदा ते गव्हाळीपर्यंतच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे व पुलांचे संरक्षण कठडे आदी खराब झाालेले आहेत. वाहनचालक व प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
या महामार्गावरील अनेक पुलावर भगदाड पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणच्या पुलांवरील स्लॅबच्या लोखंडी सळ्यावर आलेल्या आहेत. संरक्षण कठड्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अवघड वाहने पलटण्याचा धोका वाढला आहे. तसेच दुचाकीस्वारांना या मार्गावर वाहनचालविताना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो. या परिस्थितीमुळे तळोदा ते गव्हाळी दरम्यानचा मार्ग जीवघेणा ठरू पाहात आहे.
नेत्रांग व शेवाळी हा राष्ट्रीय महामार्ग असून, या मार्गावर अनेक अवजड वाहतुने अपघात ग्रस्त होत आहेत. तळोदा ते गव्हाळीपर्यतच्या महामार्गाची मे महिन्यात दुरूस्ती करण्यात आली. मात्र अवघ्या दोन महिन्यातच हा महामार्ग खड्डेमय झाला. महामार्गावर एक-दोन फुटाचे खोल खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गावर दररोज लहान मोठ्या मोटरसायकलींचे अपघात होत आहेत. हा महामार्गावर गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश अशा तीन राज्यांना जोडला गेला आहे.
गुजरात राज्यातून अवजड सामग्री महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शहरांमध्ये जात असल्याने अतिशय जास्त वजनाची वाहने व कंटेनर रात्रंदिवस ये-जा करीत असतात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेची वाहने या मार्गावरून जात असल्याने रस्ता लवकर खराब होतो. तसेच अनेक नदींवरील पुलांची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. बारडोली, व्यारा, सोनगड, नवापूरवरून मध्यप्रदेशात जाणारी सर्व वाहने या मार्गाने जात असल्याने वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो.
हा राज्य मार्ग असल्याने या मार्गाची वाहतूक क्षमता नऊ ते १५ टन वजन वाहून नेण्याची आहे. मात्र या मार्गावरून २५ टनाची अवजड वाहने जात असल्याने सातत्याने रस्ते खराब होत असून, ठोस उपाययोजना करून या मार्गाचे उत्कृष्ट दर्जाचे काम करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.