शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सूत्रधार मात्र फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मलोणी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय पथकाने बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या दोघांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मलोणी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय पथकाने बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन सुमारे १२ लाख ६६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी अटकेत असलेल्या मध्य प्रदेशातील दोघा संशयितांना शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित भटू वाणी हा अद्याप फरार आहे.३ मार्चला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या भरारी पथकाने शहाद्यात मोठी कारवाई करीत बनावट मद्य निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त केला होता. याप्रकरणी घटनास्थळावरून यम्मो उर्फ इरफान रशीद मनियार (२२, रा.खेतिया, ता.पानसेमल), साबीर मुशीर पिंजारी (४१, रा.५८, गांधी मार्ग, खेतिया, रिव्ह्युन्यूव एरिया) या दोन आरोपींंना अटक केली होती. न्यायालयाने ६ मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार भटू वाणी नामक संशयीत व्यक्ती फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मुख्य संशयित भटू वाणीच्या शोधार्थ उत्पादन शुल्क विभागाचे पथक कार्यरत असून त्याचा शोध धुळे व मध्य प्रदेशात घेतला जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून या प्रकरणाचे धागेदोरे धुळ्यापर्यंत पोहोचले असून वाणी हा धुळे येथील रहिवासी असल्याचे तपासात पुढे आले आहे. यावरून हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येते. मध्य प्रदेशातील व धुळे येथील संशयितांचा यात सहभाग असल्याने या प्रकरणाचे पाळेमुळे शोधून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, एवढी मोठी कारवाई झाल्यानंतरही शहर व परिसरातील ढाब्यांवर विनापरवाना अवैधरित्या मद्य विक्री सुरूच आहे. या ढाबे चालकांना नियमबाह्यरित्या मद्याचा पुरवठा करणाºयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांसमोर आहे.