शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाकडे आले केवळ चार हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

नंदुरबार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२०-२०२१ अंतर्गत अनुदानित बियाण्यासाठी केवळ चार शेतकरी ऑनलाइन अर्ज सादर करू शकले आहेत. ...

नंदुरबार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२०-२०२१ अंतर्गत अनुदानित बियाण्यासाठी केवळ चार शेतकरी ऑनलाइन अर्ज सादर करू शकले आहेत. २४ मे रोजी या योजनेत नोंदी करण्याची अंतिम मुदत होती. खरीप हंगामात अन्नधान्य, गळीत धान्य व व्यापारी पिकांचे प्रमाणित बियाणे व बियाणे मिनीकिट यासाठी हे अर्ज मागवण्यात आले होते.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार बियाणे वितरणासाठी २ हजार ४०७, प्रात्यक्षिकांसाठी १ हजार १५५४, आंतरपीक प्रात्यक्षिकासाठी २७६ तर बियाणे मिनीकिटसाठी ३२१ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. या अर्जांवर येत्या दोन दिवसात शासन कामकाज करुन ऑनलाइन पद्धतीने सोडत काढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मोबाइलवर एसएमएस देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत कडधान्य, धान्य व सोयाबीन बियाण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत हे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या योजनेत समावेश व्हावा यासाठी जिल्ह्यातील इतर शेतकरी उत्सुक होते. २० मे पर्यंत मुदत असलेल्या या योजनेला २४ मे पर्यंतची मुदत दिली गेली होती. परंतु यानंतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या कमीच आहे. गेल्या दोन वर्षात आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे योजनेचा लाभ आवश्यक वाटत होता. कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.